महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घरफोडीप्रकरणी दोघांना अटक

12:41 PM Jan 11, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शहरातील ताराबाई पार्कमधील टेलिफोन भवनमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या गुह्याचा 24 तासाच्या आत पोलिसांनी छडा लावून, दोघा चोरट्याना अटक केली. रोहित संजय देशपांडे (वय 34, रा. कोडणी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), प्रणव संभाजी पोवार (वय 28, रा. कोगील खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी त्याची नावे आहेत. या दोघाकडून टेलिफोन भवनमधूनमधून चोरी केलेली 3 लाख 60 हजार रुपये किंमतीची 15 आयडल केबल वायर जप्त केली. तसेच ही केबल वायर विकत घेणाऱ्या जमीर अकबर पटवेगार (रा. सदर बाजार, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

Advertisement

ताराबाई पार्क येथील भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयामधील 3 लाख 60 हजार रुपये किंमतीची 15 आयडल केबल वायर चोरीस गेली होती. चोरीची ही घटना 9 जानेवारी रोजी उघडकीस आली होती. याविषयी या कंपनीच्या महिला अधिकारी मीना कागीनकर यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती

 

 

 

 

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article