महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डीपफेक व्हिडिओप्रकरणी काँग्रेस आमदाराचा पीए, आप कार्यकर्त्याला अटक!

06:43 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 : आसाममध्येही पोलिसांकडून कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा डीपफेक व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी अहमदाबाद सायबर सेलने काँग्रेस आमदार जिग्नेश मेवानींचे स्वीय साहाय्यक आणि आप कार्यकर्त्याला अटक केली आहे. याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची दिल्ली पोलीस बुधवारी चौकशी करणार आहेत. काँग्रेसची हताशा अत्यंत वाढल्याने त्या पक्षाने माझा फेक व्हिडिओ तयार करून प्रसारित केला आहे. काँग्रेस आता खोट्याचा प्रसार करत जनतेची दिशाभूल करू पाहत आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण घटनेला मान्य नाही. आमचा पक्ष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ असल्याचे अमित शाह यांनी मंगळवारी आसाममधील गुवाहाटी येथे बोलताना म्हटले आहे.

शाह यांनी पत्रकार परिषदेत मूळ आणि डीपफेक व्हिडिओ प्ले केला. मुख्यमंत्री स्तरावरील लोकांनीही या फेक व्हिडिओला व्हायरल केले आहे. सुदैवाने मी जे बोललो होतो, ते रिकॉर्डमध्ये होते. मूळ व्हिडिओ आम्ही सर्वांसमोर सादर केल्याने सत्य उघड झाले आहे. आता काँग्रेस नेत्यावर गुन्हा नोंद झाला आहे. काँग्रेस पक्षानेच या समुदायांच्या आरक्षणाला लुटल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळल्यापासून ते राजकारणाची खालची पातळी गाठण्याचे काम करत आहेत. बनावट व्हिडिओ व्हायरल करून जनतेचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न निंदनीय आहे. भारतीय राजकारणात कुठल्याही प्रमुख पक्षाने असा प्रकार करू नये असे माझे मानणे असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.

डीपफेक व्हिडिओ प्रकरण

27 एप्रिल रोजी सोशल मीडियावर अमित शाह यांचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ तेलंगणा काँग्रेस आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शेअर केला होता. यात अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींचे आरक्षण संपविले जाणार असल्याचे बोलले जात असल्याचे दिसून आले होते. प्रत्यक्षात मूळ व्हिडिओत अमित शाह यांनी तेलंगणात मुस्लिमांसाठीचे घटनाबाह्या आरक्षण हटविण्यात येणार असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवत तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना समन्स जारी केला. रेड्डीयांची 1 मे रोजी चौकशी केली जाणार आहे. यासंबंधी भाजपने तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाने तक्रार नोंदविली होती. व्हिडिओप्रकरणी भाजपने देशभरात एफआयआर नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे. तर आसाममध्ये रितोम सिंह याला डीपफेक व्हिडिओप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

तेलंगणा मुख्यमंत्र्यांना नोटीस

दिल्ली पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रे•ाr यांना स्वत:चा मोबाईल आणण्यास सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून रेड्डी यांच्या मोबाईलची तपासणी केली जाणार आहे. डीपफेक व्हिडिओ असल्याचे स्पष्ट झाल्यावर रेड्डी यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी यासंबंधीच पोस्ट हटविली होती.

फेसबुक, एक्सकडून मागविली माहिती

दिल्ली पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या एडिटेड व्हिडिओवरून एक्स आणि फेसबुकला पत्र लिहिले आहे. हा एडिटेड व्हिडिओ कुठल्या अकौंटवरून पोस्ट करण्यात आला होता याची माहिती या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना द्यावी लागणार आहे. तेलंगणा काँग्रेसच्या हँडलवरून डीपफेक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. तेलंगणा काँग्रेस अध्यक्ष म्हणूनही रेड्डी यांना समन्स बजावण्यात आला आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article