चौकुळ येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतूक प्रकरणी दोघे ताब्यात
आंबोली वार्ताहर
सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ केगदवाडी येथे गोव्यातून पुणे येथे जाणाऱ्या होंडा सिटी ( एम एच १२ सी वाय २९५०) या कारची तपासणी केली असता सदर कारमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे १५ बॉक्स मिळून २लाख १६ हजार रुपये किंमतीची दारू , ५लाख रुपये किंमतीची होंडा कार मिळून एकूण ७ लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे . याप्रकरणी किरण ज्ञानोबा साळुंखे (४६) रा . वाकड , ता हवेली , जि पुणे ) आणि राजेश अंकुश गायकवाड (३९) रा . अंबडवेट ता . मुळशी , जि -पुणे ) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री अमोल चव्हाण व आंबोली दूरक्षेत्र अंमलदार पो. हवालदार लक्ष्मण काळे, रामदास जाधव, पोलिस नाईक मनिष शिंदे, होमगार्ड आनंद बरागडे, चंद्रकांत जंगले यांनी केलेली आहे.