For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवशक्तीनगर अनगोळ येथील घरफोडी प्रकरणी दोघांना अटक

06:22 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवशक्तीनगर अनगोळ येथील  घरफोडी प्रकरणी दोघांना अटक
Advertisement

टिळकवाडी पोलिसांची कारवाई : अडीच लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

शिवशक्तीनगर अनगोळ येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी मंगळवार दि. 18 रोजी दोघा संशयितांना अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 49 हजार रुपयांचे 17.83 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तुषार मारुती करेन्नवर (वय 22) रा. इंदिरानगर अनगोळ आणि यल्लाप्पा गजानन मुगळे (वय 28) रा. रघुनाथ पेठ अनगोळ अशी त्यांची नावे आहेत.

Advertisement

टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या शिवशक्तीनगर अनगोळ येथे काही दिवसांपूर्वी घरफोडीची घटना घडली होती. त्यामुळे या प्रकरणी पोलीस स्थानकात बीएनएस कलम 305 नुसार गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक परशराम पुजारी, उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, अडव्याप्पा कुंडेद व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर प्रकरणाचा तपास हाती घेतला होता. यानुसार वरील दोघा संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 49 हजार 260 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत

Advertisement
Tags :

.