Kolhapur : कोल्हापुरात तीन कोटींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
श्रीमंता बझार’ कंपनीकडून तीन कोटींची फसवणूक
कोल्हापूर : कमी दिवसात जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या संशयित 'श्रीमंता बझार प्रा. लि. या कंपनीच्या प्रमुखांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. कंपनीचा म्होरक्या, मुख्य सूत्रधार श्रीकांत होळेहुजुर रामचार (रा. शुक्रवार पेठ, पुणे) आणि कंपनीचा प्रमुख अकाउंटंट दिनेश योगेश भटनागर (रा. गाझियाबाद, मध्यप्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना गडहिंग्लज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
ऑक्टोबर २०२५ मध्ये गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात, अडीच महिन्यांत ३५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ५४ हजार रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या योजनेतून एकूण तीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात एकूण अकरा आरोपींचा समावेश असून, यापूर्वी अमोल बाळू चौगुले (४२, रा. चिमगाव, ता. कागल) गुन्ह्याची व्याप्ती स्पष्ट होणार
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महेश इंगळे यांनी पुणे न्यायालयाशी संपर्क साधून दोन्ही आरोपींचा ताबा घेतला. त्यांची चौकशी सुरू असून, या तपासातून इतर साथीदारांची माहिती आणि गुन्ह्याची व्याप्ती अधिक स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. याला पाच ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. इतर आरोपींचा शोध सुरू असतानाच श्रीकांत रामचार आणि दिनेश भटनागर हे पुण्यातील येरवडा कारागृहात दुसऱ्या गुन्ह्यात तुरुंगात असल्याची माहिती मिळाली.
या प्रकरणातील इतर आरोपी रणजीत राजाराम रावण (४२, रा. मुरगुड), वैशाली गुरव (रा. हलकर्णी), सदाशिव दत्तात्रय चव्हाण (६७, रा. पिंपळगाव), संतोष शिवाजी भोसले (३४, रा. औरनाळ), तुषार सुरेश चोथे (३८, रा. गडहिंग्लज), धर्मेंद्र सिंगर (रा. बुदनी, जि. सिहोर, म. प्र.), विठ्ठल मारुती जाधव (५२, रा. भीमनगर, गडहिंग्लज) आणि रमेश शिरगावे (रा. हेब्बाळ) यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.