शेणखताच्या खड्यात पडून सव्वादोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू
11:26 AM Jun 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कारवार : शेणखताच्या खड्यात पडून सव्वादोन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंकोला तालुक्यातील डोग्री ग्रामपंचायतीच्या व्याप्तीतील हळवळ्ळी येथे घडली. साध्वी श्रीकांत हेब्बार असे दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, नेहमीप्रमाणे साध्वी आपले वडील श्रीकांत यांच्या बरोबर गोठ्याकडे गेली होती. साध्वी जवळच खेळत असल्याचे पाहून वडील आपल्या कामात मग्न झाले. काम आटोपल्यानंतर हेब्बार यांना बालिका तेथे दिसून आली नाही. बालिका शेणखताच्या खड्ड्यात पडल्याचे लक्षात येताच हेब्बार यांनी साध्वीला उपचारासाठी अंकोला येथील सरकारी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी साध्वीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. साध्वीच्या मृत्यूने हेब्बार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Advertisement
Advertisement