For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : पावणे दोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन !

12:25 PM Oct 26, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   पावणे दोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
Advertisement

                     अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी

Advertisement

कोल्हापूर : दरम्यान, शनिवारी पहाटेपासून राज्यात पावसाळी वातावरण होते. सकाळी ८ वाजल्यापासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास कोल्हापुरात जोरदार पाऊस बरसला. परंतू अशा पावसातही सांगली, कराड, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मालवण, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, कल्याण, ठाणे, रायगड, नाशिक, अहिल्यानगर, पुळे, बीड येथील हजारो भाविकांचे अंबाबाईच्या दर्शनाला येणे सुरुच राहिले. दुपारनंतर पावसाने उसंत घेतली. यामुळे राज्यभरातील अन्य भाविकांना विनाव्यत्यय भाऊसिंगजी रोड, पापाची तिकटी, न्यू महाद्वार रोड, दैवज्ञ बोडींग, खरी कॉर्नर, आयोध्या चित्रमंदिर व उमा चित्र मंदिर आदी मार्गावरुन अंबाबाई मंदिराकडे येता आले.

दर्शन रांग नगारखान्यापर्यंत...

Advertisement

भाविकांच्या वाहनांनी बिंदू चौक, दसरा चौक व विद्यापीठ हायस्कूलसह मंदिराभोवतालची खासगी वाहनतळे हाऊसफुल्ल राहिल्याने भाविकांना रंकाळा तलाव अथवा अन्य ठिकाणी वाहने लावण्यासाठी जावे लागले. वाहने पार्किंग केल्यानंतर भाविकांचे मंदिराकडे येत राहिले. त्यांच्या येण्याने अंबाबाई मंदिराच्या पूर्व वरवाजाजवळील वर्शन मंडप सतत भरत होता. सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत दर्शन मंडपातील भाविकांची रांग नजिकच्या शेतकरी संघ कार्यालयापर्यंत तर कधी जुना राजवाड्याच्या नगारखान्यांपर्यंत जाऊन चहकत होती.

अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना एक ते दीड तासांचा कालावधी लागत होता. सकाळी साहे अकराच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. भाविकांची पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी तारांबळ उडाली. रस्त्यांवरील फेऱ्यावाल्यांना साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अशा परिस्थितीत बहुतांश भाविकांना पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी मंदिराभोवतालच्या दुकानदारांमध्ये जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुपारी बारानंतर मात्र पावसाने उसंत घेतली आणि पुन्हा मंदिर आवार व परिसर भाविकांनी गजबजून गेला.

अंबाबाई मंदिराभोवतालसह दुरपर्यंतच्या आंतरावरील यात्रीनिवासही भाविकांनी डाऊसफुल्ल होत राहिली. चहा, नाश्ता व जेवणाची हॉटेल्स तर सकाळी ११ वाजल्यापासून भाविकांनी हाऊसफुल्ल होत होती. रात्री साडे नऊ वाजेपर्यंत असेच चित्र अंबाबाई मंदिराच्या भोवताली पहायला मिळत होते.

वाहतुक पोलिसांवर ताण...

महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा येथील हजारो भाविकांचे दिवसभर अंबाबाई मंदिराकडे येणे जाणे सुरु होते भाविकांची वाहने करवीर नगर वाचन मंदिर, भाऊसिंगजी रोड, पापाची तिकट दैवज्ञ बोडींग, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर या रस्त्यावर येत होती. शनिवारच्या सुट्टीच अंदाज घेऊन शहर वाहतूक शाखेने सकाळपासून विविध रस्त्यांवरील वाहतुक पोलीस तैना केले होते. परजिल्ह्यातील भाविकांची वाहने जस जस रस्त्यांवर येऊ लागली तशी वाहतुकीच कोंडी सतत होत राहिली. याचा ताण वाहतूक पोलिसांवर पडत होता. परंतू पोलिसांनी संयमा वाहतुकीला शिस्त लावली. रुग्णवाहिकांना वाट करण्यासाठी मात्र पोलिसांना कसरत कराव लागली

Advertisement
Tags :

.