For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime : जन्मदात्याकडून जुळ्यांची हत्या; बापाला अटक

06:39 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
solapur crime   जन्मदात्याकडून जुळ्यांची हत्या  बापाला अटक
Advertisement

                        हिंगणी परिसरात शोककळा पसरली

Advertisement

करमाळा : करमाळा तालुक्यातील हिंगणी गावात एक गंभीर व मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील सुहास जाधव (वय ३२) यांनी आपल्या दोन अल्पवयीन मुलांना शेतातील विहिरीत ढकलल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्यासुमारास सुहास जाधव यांनी आपल्या मालकीच्या शेतात असलेल्या विहिरीत आपली मुले शिवांश जाधव आणि श्रेया जाधव (दोघांचे वय ८ वर्षे) यांना ढकलले. या घटनेत दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेनंतर संशयित सुहास जाधव घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. शोधमोहीम राबवून संशयित सुहासजाधव याला बार्शी येथे ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशीसाठी त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, सुहास जाधव यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असून नातेवाईकांचे जबाब तसेच इतर पूरक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे हिंगणी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.