पाराशर गर्ल्स हायस्कूलमध्ये भरला एकवीस वर्षांनी वर्ग : स्नेह मेळाव्या निमित्त मिळाला जुन्या आठवणींना उजाळा
शिये वार्ताहर
नवे पारगाव (ता.हातकणंगले ) येथील पाराशर गर्ल्स हायस्कूलच्या सन २००२ - २००३ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनींचा एकवीस वर्षानी वर्ग भरला आणि शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एच.शिंदे होते. तर शिक्षक जे. ए. .लांडे, शिक्षिका सौ.एस.ए पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी आर. एस. पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
मुख्याध्यापक शिंदे व शिक्षक लांडे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे व सुशीला साळुंखे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात केली.यावेळी विद्यार्थिनी अर्चना देशमुख,अनिता पाटील, सोनाली डोईजड यांच्या हस्ते सर्व शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक शिंदे म्हणाले, सर्वांनी आपला वैयक्तिक स्तर उंचावत सामाजिक कार्यात सहभागी व्हावे.आणि तणावमुक्त जीवन जगुन कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ जपावे.
विद्यार्थिनी अर्चना देशमुख,अनिता पाटील, सोनाली डोईजड यांच्या हस्ते सर्व शिक्षक वृंद यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जयश्री पाटील, योगिता पाटील, दिपाली पाटील, रागिनी मोहिते या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थिनी जयश्री पाटील यांनी केले. सुत्रसंचलन दिपाली पाटील यांनी केले.तर आभार मयुरी घोगरे यांनी मानले.
या स्नेह मेळाव्यासाठी सुवर्णा पोवार, सीमा कुंभार, अश्विनी पाटील, नकुशा पाटील, पुनम बोने, सारिका चाळके, अश्विनी भांडवले, वैशाली पोवार, रूपाली चाळके, अस्मिता भापकर, मनीषा पाटील, रूपाली शिंदे, जया शिंदे यांच्या सह सुमारे २२ माजी विद्यार्थिंनी, शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.