For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्लोरीन गॅस गळतीमुळे बारा कामगार अत्यवस्थ

06:51 AM Jan 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
क्लोरीन गॅस गळतीमुळे बारा कामगार अत्यवस्थ
Advertisement

कारवार येथील ग्रासीम इंडस्ट्रिजमधील घटना

Advertisement

प्रतिनिधी/ कारवार

काही दिवसांपूर्वी गॅस गळती होऊन कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी पुन्हा एकदा येथून जवळच्या ग्रासीम इंडस्ट्रिजमध्ये क्लोरीनची गळती होऊन बारा कामगार अत्यवस्थ होण्याची घटना घडली आहे. कामगारांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्लोरीन गळतीमुळे अत्यवस्थ झालेले कामगार बिहार आणि झारखंडमधील असल्याचे सांगण्यात आले. अन्य कांही कामगारांना या गळतीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अस्वस्थ झालेल्या कामगारांची नावे नीळकंठ (वय 22), जहानूर (वय 20), कमलेश शर्मा (वय 22), नंद किशोर (वय 21), दीपू (वय 28), अजीज (वय 23), कल्लू (वय 37), सुजन (वय 26), नजीमुल्ला (वय 24), बीजनकुमार (वय 27), किशनकुमार (वय 28) आणि मोहित शर्मा (वय 21) अशी आहेत.

Advertisement

या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, येथून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील बाणीगा येथे आदित्य बिर्ला यांच्या मालकीचा ग्रासीम कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. शनिवारी दुपारी काही कामगारांना आग भडकण्याचा आणि श्वसनाचा त्रास जाणू लागला. कारखान्यातील क्लोरीन गळतीमुळे हे घडत आहे, असे लक्षात येताच त्रास होत असलेल्या कामगारांना तातडीने  उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी कांही कामगारांवर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत. कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा  रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. कारवारचे डीवायएसपी गिरीश यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह कारखान्याकडे धाव घेऊन पाहणी केली.

कंपनीच्या विरोधात स्थानिकांचा  संताप

कारखान्यापासून हाकेच्या अंतरावर बाणीगा हे गाव वसलेले आहे. गॅस गळतीची माहिती मिळताच स्थानिक मोठ्या संख्येने कारखान्याजवळ जमा झाले. आणि त्यांनी कारखान्याकडून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत घेण्यात येत असलेल्या उपाययोजनाबद्दल असमाधान व्यक्त केले आणि कारखान्याच्या विरोधात संताप व्यक्त केला

Advertisement
Tags :

.