For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीव्हीएसचा 5.9 लाख वाहन विक्रीचा जूनमध्ये विक्रम

06:36 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीव्हीएसचा 5 9 लाख वाहन विक्रीचा जूनमध्ये विक्रम
Advertisement

इलेक्ट्रीक वाहनांची तीनपट झाली विक्री : निर्यातही दमदार

Advertisement

वृत्तसंस्था नवी दिल्ली 

दुचाकी वाहन क्षेत्रामध्ये स्पर्धा आता गतिमान झाली असून टीव्हीएस मोटर्सने या स्पर्धेमध्ये आघाडी घेण्याचा मोठा प्रयत्न केलेला दिसून आला आहे. त्यांच्या जून महिन्यातील वाहनांची विक्रीची संख्या पाहता पहिल्यांदाच विक्रीमध्ये सर्वाधिक वाढ झालेली पाहायला मिळते आहे. 5 लाख 90 हजार इतक्या वाहनांची विक्री एकट्या जून महिन्यामध्ये टीव्हीएसने केली असल्याचे समजते. यामध्ये पाहता महत्त्वाचे म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री तीन पट वाढलेली दिसून आली.

Advertisement

 आतापर्यंतची स्पृहणीय कामगिरी

वाहन निर्माती कंपनी टीव्हीएस मोटर्स यांची जून 2026 मधली ही आतापर्यंतची दमदार कामगिरी आहे. कंपनीची एकूण वाहन विक्री वर्षाच्या आधारावर 47 टक्के वाढलेली आहे. 5लाख 90 हजार तीन इतक्या वाहनांची विक्री कंपनी केली आहे. जून 2025 मध्ये पाहता 4 लाख 2 हजार इतक्या वाहनांची कंपनीने विक्री केली होती. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारांमध्ये टीव्हीएसच्या वाहनांना मजबूत मागणी पाहायला मिळाली.

दुचाकी विक्रीची आकडेवारी

एकूण दुचाकी विक्री 5 लाख 65 हजार 417 इतकी राहिली असून मागच्या वर्षापेक्षा ही विक्री 47 टक्के अधिक आहे. जून 2026 मध्ये देशांतर्गत विक्री दुचाकीची 4 लाख 11 हजार इतकी झाली असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये विक्रीत 46 टक्के वाढ दर्शवली गेली आहे. मागच्या वर्षी 2 लाख 81 हजार दुचाकींची विक्री झाली होती. भारतीय बाजारामध्ये कंपनीची या क्षेत्रामध्ये मजबूत पकड निर्माण होत आहे, हे यावरून सिद्ध होते आहे.

मोटरसायकल आणि स्कूटर या गटांमध्ये सुद्धा कंपनीने विक्रीत चांगली कामगिरी नोंदलेली आहे. मोटरसायकल विक्री 42 टक्के वाढत 2 लाख 67 हजारहून अधिक झाली असून स्कूटर विक्रीमध्ये 53 टक्के वाढ झाली असून 2 लाख 47 हजार 950 इतक्या स्कूटरची विक्री जूनमध्ये करण्यात आली आहे.

48 हजारहून अधिक इलेक्ट्रीक दुचाकी

इलेक्ट्रिक दुचाकींचा विचार करता टीव्हीएसने या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. जून 2026 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये तीन पट वाढ नोंदवली आहे. 48,537 इतक्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री कंपनीने जूनमध्ये केली. जी मागच्या वर्षी याच महिन्यात 14 हजार 400 इतकी होती. आंतरराष्ट्रीय बाजारातही जवळपास 1 लाख 72 हजार 355 इतक्या वाहनांची विक्री कंपनीने केली आहे. या आंतरराष्ट्रीय वाहन विक्रीत देखील 47 टक्के वाढीव कामगिरी नोंदवली. दुचाकी निर्यात 48 टक्के वाढत 1 लाख 54 हजार पेक्षा अधिक झाली आहे.

तिमाहीत 16 लाखवर संख्या

आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या अवधीत आतापर्यंत सर्वाधिक 16 लाख 31 लाख अधिक वाहनांची विक्री करण्याचा विक्रम केला आहे. याच दरम्यान दुचाकी विक्री 27 टक्के वाढली आहे. एकूण विकी 15 लाख 64 हजार इतकी झाली आहे. तीनचाकी वाहन विक्रीमध्ये सुद्धा 48 टक्के इतकी वाढ झाली आहे.

Advertisement
Tags :

.