टीव्हीसचा तिमाही नफा 4 टक्क्यांनी तेजीत
नफा कमाई 618 कोटींच्या घरात : महसूल 10 टक्क्यांनी वधारला : ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान 12 लाख वाहनांची विक्री
मुंबई :
वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीव्हीएस मोटर्सची आर्थिक वर्ष 2024-25 मधील तिमाहीत 618.48 कोटींची नफा कमाई झाली आहे. वर्षाच्या आधारे यामध्ये 4.23 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीत कंपनीला 593.35 कोटींचा नफा झाला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत टीव्हीएस मोटर्सचा स्टॅण्डअलोन ऑपरेशनल महसूल वर्षाच्या आधारे 10.33 टक्क्यांनी वधारुन तो 9,097.05 कोटी रुपये राहिला आहे. तिसऱ्या तिमाहीत एकूण नफा कमाई 9,074.36 कोटी रुपयांची झाली आहे. वर्षाच्या आधारे ही वाढ 9 टक्के आहे.
तिसऱ्या तिमाहीत 12.11 लाख वाहनांची विक्री
टीव्हीएस मोटर्सने यंदाच्या आर्थिक वर्षात 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण 12.11 लाख वाहनांची विक्री केली आहे. मागील वर्षात समान तिमाहीत हा आकडा 11 लाख इतका होता.
ईव्ही विक्रीत वर्षात 57 टक्क्यांची वाढ
यासह इलेक्ट्रिक वाहनांची वर्षातील विक्री जवळपास 57 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच ती 76 हजार युनिट्सपर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षात हा आकडा 48 हजार इतका होता.