For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीव्हीएस मोटर्सला 940 कोटीचा नफा, नफा 49 टक्के वाढला

06:27 AM Jan 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
टीव्हीएस मोटर्सला 940 कोटीचा नफा  नफा 49 टक्के वाढला
Advertisement

मुंबई :

Advertisement

दुचाकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीव्हीएस मोटर्सने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीतील तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने 940 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये कंपनीने 841 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. त्या तुलनेत यंदाच्या नफ्यामध्ये एकूण 49 टक्के इतकी वाढ नोंदवली गेली आहे. टीव्हीएस मोटरने या संबंधातली माहिती शेअर बाजाराला बुधवारी दिली. या बातमीनंतर कंपनीचा समभाग बीएसईवर इंट्राडे दरम्यान 3.27 टक्के वाढत 3682 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारच्या सत्रामध्ये टीव्हीएस मोटरचा समभाग 3565 रुपयांच्या भावावर बंद झाला होता.

14 हजार कोटीचा महसूल

Advertisement

चेन्नईमध्ये मुख्यालय असणाऱ्या या कंपनीने महसुलामध्ये 34 टक्क्यांची वाढ नोंदवली असून तिसऱ्या तिमाहीमध्ये 14 हजार 755 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीमध्ये 11,034 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त टीव्हीएस कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये तिमाहीमध्ये दमदार कामगिरी नोंदवली आहे.

तिमाहीत सर्वोच्च वाहन विक्री

मागच्या तिमाहीमध्ये कंपनीने 15.44 लाख इतक्या दुचाकींची विक्री करत सर्वोच्च विक्री नोंदवली. डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीने 12.12 लाख इतक्या दुचाकींची विक्री केली. मोटर सायकल विक्री 31 टक्के वाढीसोबत 7.26 लाख इतकी झाली असून स्कूटर्स 25 टक्के वाढत 6.14 लाख इतक्या विक्री करण्यात आल्या. कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकींनाही चांगला प्रतिसाद मिळाला असून यामध्ये 40 टक्के वाढ नोंदवली आहे. मागच्या तिमाहीमध्ये कंपनीने 1.06 लाख दुचाकींची विक्री केली आहे.

Advertisement
Tags :

.