टीव्हीएसची पहिली सीएनजी स्कूटर लाँच
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोत सादर : बीएमडब्ल्यूची नवी गाडीही प्रदर्शित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस मोटर्स यांनी आपली पहिलीवहिली सीएनजीवर आधारीत दुचाकी सादर केली आहे. कंपनीने नवी सीएनजी ज्युपिटर दिल्लीत सुरू असलेल्या भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सादर केली आहे. या स्कूटरमध्ये 1.4 किलो ग्रॅमची सीएनजी टाकी असणार असून टँक प्लास्टीक पॅनलने युक्त आहे.
स्कूटरचे डिझाईन आकर्षकपद्धतीने रचण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्याप्रमाणे सदरची सीएनजी ज्युपिटर 1 किलो इंधनावर 84 कि.मी.चे अंतर पार करु शकणार आहे. यासोबतच कंपनीने 2 लीटरची पेट्रोलची टाकीसुद्धा दिली आहे. पेट्रोल आणि सीएनजी या इंधनाचा वापर करुन गाडी चालविल्यास 226 कि.मी.चे मायलेज गाडी देऊ शकते, असा दावा कंपनी करत आहे. 124.8 सी.सी.चे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले असून गाडी 80 कि.मी. प्रतितास इतका वेग घेऊ शकते.
बीएमडब्ल्यू एक्स 3 लाँच
या प्रदर्शनामध्ये बीएमडल्ब्यूनेसुद्धा आपली नवीन लग्झरी कार बीएमडब्ल्यु एक्स-3 लाँच केली आहे. जिची किंमत 76 लाखांच्या घरामध्ये असणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये या गाडीचे प्रथम सादरीकरण केले होते. दिल्लीत सुरू असणाऱ्या भारत मोबिलीटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सदरची गाडी प्रदर्शित करण्यात आली आहे. एक्सड्राईव्ह 20एम स्पोर्ट्स आणि एक्सड्राईव्ह 20डीएम स्पोर्ट्स या दोन प्रकारामध्ये गाडी लाँच करण्यात आली आहे. 2 लीटर 4 सिलिंडरचे पेट्रोल इंजिन गाडीत दिले असून 8 स्पीड, ऑटोमेटिक ट्रॉन्स्मीशनची सोय यात दिली गेली आहे. पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या पर्यायासह ही गाडी खरेदी करता येणार आहे.
वैशिष्ट्यो
या गाडीत स्लिक एलईडी हेडलाईटस्, 19 इंचाच्या अलॉयव्हिल्स देण्यात आल्या आहेत. 14.9 इंचाची टचस्क्रीन गाडीत दिली असून प्रिमीयम 15 स्पिकर हर्मनकार्डोनची साऊंडसिस्टीम दिली आहे. सुरक्षेकरिता एअरबॅग्स देण्यात आल्या असून अॅडव्हॉन्सड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम तसेच 360 डिग्री फिरणारा कॅमेरा दिला गेला आहे.