For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टीव्हीएस ज्युपिटर फेसलिफ्ट भारतीय बाजारात

06:20 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
टीव्हीएस ज्युपिटर फेसलिफ्ट भारतीय बाजारात
Advertisement

किंमत 73,700 पासून सुरु : होंडा अॅक्टीव्हासोबत स्पर्धा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टीव्हीएस मोटारने भारतीय बाजारपेठेत त्यांच्या सर्वात लोकप्रिय स्कूटर ज्युपिटर 110 ची सुधारीत आवृत्ती लॉन्च केली आहे. नवीन ज्युपिटर नवीन पिढीचे इंजिन, नवीन डिझाइन आणि पूर्वीपेक्षा अधिक वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आले आहे. यामध्ये इमर्जन्सी स्टॉप सिग्नल, ऑटो-कट टर्न इंडिकेटर, व्हॉईस कमांड आणि फॉलो-मी हेडलॅम्प यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Advertisement

स्कूटर 4 प्रकार आणि 6 नवीन रंग पर्यायांसह उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 73,700 रुपये ठेवण्यात आली आहे. टीव्हीएसने 11 वर्षांपूर्वी ज्युपिटर 110 स्कूटर लाँच केली होती. त्याची आतापर्यंत 6.5 दशलक्ष युनिट्सची विक्री झाली आहे. भारतात त्याची स्पर्धा होंडा अॅक्टीव्हाशी राहणार आहे.

एलईडी हेडलॅम्पसह नवीन लाइट बार

डिझाइनबद्दल बोलायचे तर, नवीन ज्युपिटर पूर्णपणे बदललेली आहे. यामध्ये नवीन एलईडी हेडलॅम्प, फ्रंट अॅप्रनवरील इंटिग्रेटेड टर्न इंडिकेटरसह एलईडी लाइट बार यासारख्या प्रगत सुविधांचा समावेश आहे. टीव्हीएसने ग्लॉस ब्लॅक प्लास्टिकवर विशेष लक्ष दिले आहे, कारण त्यामुळे स्कूटरवर स्क्रॅच पडत नाहीत.  टीव्हीएसने नवीन ज्युपिटरमध्ये 109.7सीसी इंजिन बदलून नवीन जनरेशन सिंगल सिलेंडर, 113.3सीसीचे 4 स्ट्रोक टू व्हॉल्व्ह इंजिन एअर-कूल्ड आणि फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानासह दिले आहे. यामुळे मायलेज अधिक मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Advertisement
Tags :

.