टीव्हीएस आयक्यूब 3.1 भारतात लाँच
1.05 लाख किंमत: 121 किमी मायलेज
नवी दिल्ली : टीव्हीएस मोटारने भारतीय बाजारात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आयक्यूब 3.1 ही नव्या प्रकारातील गाडी सादर केली आहे. 3.1 केडब्लूएच बॅटरी पॅकसह ही इलेक्ट्रीक दुचाकी येणार आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 1.05 लाख रुपये आहे. दरम्यान कंपनीचा दावा आहे की इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्जवर 121 किलोमीटर धावणार आहे. यासह, ही स्कूटर आता 4 बॅटरी पॅक पर्यायांसह 6 प्रकारांमध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. भारतीय बाजारात बजाज चेतक आणि ओला ए1 यांच्यासोबत स्पर्धा करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अधिकतम वेग 84 किमी प्रति तास इतका गाडी घेऊ शकणार आहे.
काय आहेत वैशिष्ट्यो
या गाडीत टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन असून 12 इंचाची अलॉय व्हील्स दिली आहेत. हेडलाइट व टेललाइट हे एलईडी प्रकारातील आहेत. पार्क असिस्ट वैशिष्ट्या हे वाहनधारकाला गाडी पार्क करण्यासाठी सहाय्य करतं. पर्ल व्हाइट, टीटॅनियम ग्रे, स्टारलाइट ब्ल्यू व कॉपर ब्राँझ अशा चार रंगात ही गाडी सादर करण्यात आली आहे. जानेवारी 2020 मध्ये दाखल झालेल्या आयक्युबने विक्रीचा 6 लाखाचा टप्पा पार केला आहे.