‘टीव्हीएस’ रोनिन रोडस्टर दुचाकी सादर
एसएमएस अलर्ट मिळणार : बजाज पल्सर 250 देणार टक्कर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टीव्हीएस कंपनीने आपल्या नवीन दुचाकीचे नुकतेच सादरीकरण केले आहे. या नवीन दुचाकीला कंपनीने रोनिन (Ronin) असे नाव दिले आहे. रोनिन टीव्हीएस पहिली नियो रेट्रो रोडस्टर दुचाकी असल्याचे सांगितले आहे. या दुचाकीच्या तीन मॉडेल्स सादर केल्या आहेत.
सदरच्या गाडीची किमत ही 1.49 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ही किमत मॉडेलनुसार बदलत जात असल्याचेही स्पष्ट केले आहे. यासह बेस प्लसची किमत 1.56 लाख आणि मिड मॉडेलची किमत ही 1.69 ते 1.71 लाख रुपयाच्या दरम्यान राहणार आहे. टीव्हीएसची ही पहिली दुचाकी असून याचे 225.9 सीसी सिंगल इंजिन आणि नवीन स्प्लिट डुअल क्रेडल प्रेमसोबत येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
टीव्हीएसची रोनिन दुचाकी ही भारतीय बाजारात आगामी काळात बजाज पल्सर 250, रॉयल एनफिल्ड हंटर 350, रॉयल एनफिल्ड हिमालयन स्क्रॅम411 आणि येज्दी स्क्रॅम्बलर यासारख्या दुचाकींना टक्कर देणार आहे. टीव्हीएस सादर केलेली दुचाकी ही बुलेटच्या लुकमध्ये दाखल केली आहे. कंपनीने दुचाकीमध्ये 17 इंच एलॉय व्हील्स दिले आहेत. यात रिअरमध्ये गॅस चार्ज्ड मोनोशॉक रिअर सस्पेंशनही दिले आहे.
अन्य फिचर्स
- दुचाकीमध्ये टी शेपसह एलइडी डीआरएल मिळणार आहे.
- एक डिजिटल इंस्टुमेंट क्लस्टर आणि ब्लूटय़ुथ कनेक्टिविटी
- दुचाकीत सेफ्टीसाठी विशेष फिचर्स
- डबल चॅनेल एबीएस फिचर्स देण्यात आले आहे
- लायटिंग ब्लॅक आणि मॅग्मा रेड या रंगात येणार
- डिजिटल सुविधांसह अन्य कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार
- दुचाकीमध्ये 120 केमीपीएच टॉपचे स्पीड मिळणार