टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 ब्लॅक एडिशन बाईक लाँच
बेळगाव : टीव्हीएस मोटार कंपनीची बहुप्रतिक्षित टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 ब्लॅक एडिशन बाईक हाय-टेक टीव्हीएस बेळगाव येथे लॉन्च करण्यात आली. याप्रसंगी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, बेळगाव केंद्राचे अध्यक्ष ए.आर. कुलदीप हंगीरगेकर हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. पिंपळ कट्टा, जुना पीबी रोड, बेळगाव जवळील हाय-टेक मोटार्स अँड ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड येथे झालेल्या कार्यक्रमात अतिथी म्हणून कुलदीप हंगिरगेकर यांनी सहभाग घेतला आणि उद्घाटन केले. यावेळी हायटेक मोटार्सचे संचालक विनयकुमार बालिकाई, राजेश भोसगी, बसवराज तंगडी, राजेंद्र देसाई व जीएम विनोद के., कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते. नवीन टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 ब्लॅक एडिशन बाईकची उल्लेखनीय प्रगती आणि आकर्षक डिझाईन हायलाइट करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे.
पाहुणे ए.आर.कुलदीप हंगीरगेकर यांनी टीव्हीएस मोटार कंपनीचे ऑटोमोटिव्ह उद्योगातील सतत नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्टतेचे कौतुक केले. हाय-टेक मोटार्स अँड ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 ब्लॅक एडिशनच्या या नवीन आवृत्तीच्या लाँच, बाईकचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक डिझाईनवर जोर देऊन ही बाईक तयार करण्यात आली आहे त्याबद्दल उत्साह व्यक्त केला. अपाचे आरटीआर 160 बाईक दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे आणि आम्ही सर्व मोटारसायकलप्रेमींना आमच्या शोरूमला भेट देण्यासाठी आणि टीव्हीएस मोटार कंपनीच्या उत्कृष्टतेचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित करतो, असे हायटेक मोटार्सच्या संचालकांनी यावेळी बोलताना सांगितले.