टीव्हीएस अपाचे ‘आरटीआर 160 4 व्ही“ लाँच
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
टीव्हीएस मोटर इंडियाने 31 मार्च रोजी भारतात आपली सर्वात लोकप्रिय स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर 160 4 व्हीचे अपडेटेड 2026 मॉडेल लाँच केले. आता बाईकच्या बेस व्हेरिएंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प, ऑल-एलईडी लायटिंग आणि असिस्ट व स्लिपर क्लच यांसारखी प्रीमियम वैशिष्ट्यो राहणार आहेत.
2026 टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4 व्ही तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1,25,440 ठेवण्यात आली आहे. बाईकच्या मिड आणि टॉप व्हेरिएंटमध्ये सोनेरी रंगाचे अपसाइड-डाउन फोर्क्स
नवीन ग्राफिक्ससह ऑल एलईडी लायटिंग
बाईकचा आक्रमक स्ट्रीटफायटर लूक, फ्युएल टँक आणि बॉडी लाइन्स
टँकवरील नवीन ग्राफिक्स, सिंगल-पीस सीट
परफॉर्मन्स:
-यामध्ये 159.7 सीसी सिंगल-सिलेंडर, 4-व्हॉल्व्ह एअर/ऑइल-कूल्ड इंजिन
-5-स्पीड गिअरबॉक्सला जोडलेले आहे. यामुळे गिअर शिफ्टिंग सोपे होते.
-अर्बन, रेन आणि स्पोर्ट असे तीन रायडिंग मोड्स मिळणार
-इंजिन अर्बन आणि रेन मोडमध्ये 15.64 पीएस पॉवर आणि 14.14 एनएम कमाल टॉर्क निर्माण करते.
--टॉप व्हेरिएंटमध्ये 5-इंचाचा टीएफटी डिस्प्ले आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशनला सपोर्ट आहे.