कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एसआयआर विरोधात टीव्हीकेची सर्वोच्च न्यायालयात धाव

06:35 AM Nov 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

अभिनेता विजय याचा पक्ष तमिलगा वेत्री कजगमने (टीव्हीके) तामिळनाडूत मतदारयादी फेरपडताळणी (एसआयआर) करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यापूर्वी टीव्हीकेने  एसआयआर विरोधात राज्यव्यापी निदर्शने केली होती. एसआयआर विरोधात यापूर्वी द्रमक, माकप, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस (पश्चिम बंगाल), आययूएमएल या  पक्षांनी  याचिका दाखल केली आहे.  आयोगाने 9 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबविण्याची घोषणा केली होती. आयोगाने याला एसआयआरचा दुसरा टप्पा ठरविले आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा 4 नोव्हेंबर रोजी सुरु झाला असून 4 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Advertisement

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अंतिम मतदार यादी 7 फेब्रुवारी 2027 रोजी प्रकाशित केली जाणार आहे. एसआयआरचा दुसरा टप्पा अंदमान आणि निकोबार बेटसमूह, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, लक्षद्वीप, मध्यप्रदेश, पु•gचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पार पडत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article