महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साई स्पोर्ट्सकडे टी.व्ही.सेंटर चषक

10:22 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : टि.व्ही. सेंटर व्हॉलिबॉल संघटना आयोजित दसरा महोत्सवानिमित्त निमंत्रीयांच्या व्हॉलिबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात साई स्पोर्ट्स भुतरामहट्टी संघाने उळागड्डी खानापूर संघाचा 2-1 अशा सेटमध्ये पराभव करुन टी. व्ही. सेंटर चषक पटकाविला. बाळेश कोंपी, प्रकाश लोहार यांना वैयक्तिक बक्षीसे देवून गौरविण्यात आले. टि.व्ही. सेंटर येथे महानगरपालिकेच्या मैदानावरती घेण्यात आलेल्या या व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय बिचव्हॉलिबॉल स्पर्धेतील ज्येष्ठ व्हॉलिबॉलपटू मोनेश्वर पाटील, ज्येष्ठ व्हॉलिबॉल प्रशिक्षक हर्षवर्धन शिंगाडे, रमेश यादव, संतोष बिरगुडी, दुंडप्पण्णावर, इम्तियाज शेखसह मान्यवरांच्या हस्ते नेटवरील चेंडूचे फित कापून झाले. या निमंत्रीत स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील 12 संघांनी भाग घेतला होता.

Advertisement

स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात साई स्पोर्ट्स भुतरामहट्टीने एम. के. हुबळी संघाचा 25-15, 16-25, 15-12 तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात उळागड्डी खानापूर संघाने टि.व्ही. सेंटर संघाचा 25-17, 25-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्याचे उद्घाटन मोनेश्वर पाटील यांच्या हस्ते झाले. या सामन्यात साई स्पोर्ट्स भुतरामहट्टी संघाने उळागड्डी खानापूर संघाचा 20-25, 25-20, 15-11 असा सेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
Advertisement

स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे मोनेश्वर पाटील, एच. एस. शिंगाडे, युवराज कांबळे, संतोष दुडगुडी, दुंडप्पण्णावर, इम्तियाज शेख, विद्यारन मुरकीभांवी, श्रीकांत पाटील, चेतन शिंदे, दशरथ नाडगेर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या साई स्पोर्ट्स भुतरामहट्टी संघाला चषक, 5 हजार रुपये रोख व उपविजेत्या खानापूर संघाला 3 हजार रुपये व चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट लिफ्टर बाळेश कुंपी,-साई स्पोर्ट्स, उत्कृष्ट स्मॅचर प्रकाश लोहार-साई स्पोर्टस्, उगवता खेळाडू रवी चौगुला, उकृष्ट ब्लॉकर रॉनी डिसोजा यांना चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून एच. एस. शिंगाडे, शंकर कोलकार, राजू चौगुला, उमेश मजुकर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी टी. व्ही. सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article