कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तुतारी’ची शरद पवार गटास अनुमती; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

06:56 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी उपयोग : 

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

‘तुतारी वाजविणारा माणूस’ या चिन्हाचा आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी उपयोग करण्याची अनुमती सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला दिली आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह अन्य कोणत्याही पक्षास देऊ नये, अशीही सूचना न्यायालयाने केली आहे.

शरद पवार गटास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार हे नावही उपयोगात आणण्यास अनुमती देण्यात आली आहे. तर अजित पवार गटास वृत्तपत्रात जाहिरात देऊन घड्याळ हे चिन्ह या प्रकरणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत उपयोगात आणले जाईल, अशी माहिती घोषित करण्याचा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा कुणाचा, या संबंधीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचाच आहे, असा निर्णय दिलेला आहे. तर आमदार अपात्रता प्रकरणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही त्यांच्या निर्णयात केंद्रीय निवडणूक आयोगाचा हाच निर्णय मानला आहे. तथापि, या संबंधीचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ घड्याळ हे चिन्ह आणि मूळ नाव कोणाला मिळणार हे निर्धारित होणार आहे.

घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट

अजित पवार गटाला मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळचे घड्याळ हे चिन्ह सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या चिन्हासंबंधीचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतरच ते नेमके कोणाचे हे ठरणार आहे. त्यामुळे हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची माहिती मतदारांना असणे आवश्यक आहे. परिणामी, सर्वोच्च न्यायालयाने ही माहिती लोकांना जाहीर नोटीसीद्वारे कळविण्याचा आदेश दिला आहे. दोन्ही गट सध्या त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या अनुक्रमे घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हांचा उपयोग करीत आहेत.

वाद नेमका काय

साधारणत: सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. या पक्षाच्या 54 आमदारांपैकी 40 हून अधिक आमदारांसह अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर पडून महाराष्ट्रात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे खरा राष्ट्रवादी पक्ष कोणाचा, हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारी पोहचला होता. आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती न दिल्याने सध्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे चिन्ह आणि नाव उपयोगात आणण्याचा अधिकार अजित पवार गटाला देण्यात आला आहे. हाच वाद सर्वोच्च न्यायालयातही प्रलंबित असून त्यावर नंतर सुनावणी होणार आहे.

सध्या उत्सुकता उमेदवारांसंबंधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये न्यायालयात वाद रंगला असला तरी, सध्या प्रमुख उत्सुकतेचा विषय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हा आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यामधील जागावाटप अद्याप निर्धारित झालेले नाही. तथापि, भारतीय जनता पक्षाने आपल्या 20 लोकसभा उमेदवारांची घोषणा महाराष्ट्रासाठी केली आहे. युतीचे जागावाटपही लवकरच घोषित होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटपही अधांतरी आहे. मात्र, तेही येत्या दोन तीन दिवसांमध्ये घोषित होणार आहे. जागावाटप झाल्यानंतरच प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकंदर 48 जागा आहेत.

शरद पवार गटाला दिलासा

ड तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासंबंधीची अनिश्चितता संपुष्टात

ड हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट यांनाच देण्याचा आदेश

ड घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट आहे अशी माहिती लोकांना द्यावी लागणार

ड अद्याप युती-आघाडीचे अंतिम जागावाटप नाही, त्यासंबंधी उत्सुकता

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article