For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : अकोलेकाटी शाळेतील आनंद बाजारात ३२ हजारांची उलाढाल

07:07 PM Jan 11, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   अकोलेकाटी शाळेतील आनंद बाजारात ३२ हजारांची उलाढाल
Advertisement

                             बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांची ३२ हजारांची उलाढाल

Advertisement

उत्तर सोलापूर : अकोलेकाटी सोमनाथ नगर (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भरलेल्या विद्यार्थी आनंद बाजारात ३२ हजारांची उलाढाल झाली. अकोलेकाटी सोमनाथनगर येथे आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित विविध खाद्यपदार्थांचे सुमारे ७० स्टॉल लावण्यात आले होते.

यामध्ये भाजीपाला, फळे, पाणीपुरी, भेळ, वडापाव, शेंगाचे लाडू, अंडापाव, चिकन बिर्याणी, चिकन सिक्सटी फाईव्ह, वडापाव, भजे, पापड, कोबी मंचुरीयन, मठ्ठा, फ्रूट सॅलड, पोहे, उपीट, गुलाबजामुन आदी पदार्थाचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले होते. या आनंद बाजारात गावातील व परिसरातील पालकांनी खरेदीसाठीम्हणून या बाल आनंद बाजाराचे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या बाल बाजारातून विद्यार्थ्यांना आर्थिक उलाढाल कौशल्य, व्यावहारिक ज्ञान, संवाद कौशल्य निर्माण व्हावे, सचोटीने व्यवसाय कसा करावा आयोजन करण्यात आले होते. बाल बाजारात विद्यार्थ्यांची ३२ हजारांची उलाढाल झाल्याचे शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण गणपत माने यांनी सांगितले.

Advertisement

कार्यक्रमाचे उद्घाटन अकोलेकाटीच्या लोकनियुक्त सरपंच अंजली क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामसेविका मीरा पिटले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण माने, प्रवीण घोडके, लक्ष्मण उकिरडे, शीला नन्नवरे यांनी परिश्रम घेतले. सागर यादव यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement
Tags :

.