कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पाकिस्तानात पोहोचले तुर्कियेचे गुप्तचर प्रमुख

06:24 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्लामाबाद

Advertisement

भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात सैन्य कारवाई करण्यात येणार असल्याचे मानले जात सताना तुर्कियेचे सैन्य शिष्टमंडळ लेफ्टनंट जनरल यासर कादिओग्लू यांच्या नेतृत्वात इस्लामाबादमध्ये पोहोचले आहे. तुर्कियेच्या सैन्य अधिकाऱ्यांचा पाकिस्तान दौरा महत्त्वपूर्ण काळात होत आहे. तुर्किये जनरल स्टाफचे गुप्तचर प्रमुख लेफ्टनंट जनरल यासर कादियोग्लू यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पाकिस्तानच्या वायुदल मुख्यालयाचा दौरा केला आहे. भारताकडून कारवाई होण्याच्या शक्यतेदरम्यान पाकिस्तानसाब्sात तुर्कियेने स्वत:ची सैन्य भागीदारी वाढविली आहे.

Advertisement

तुर्किये पाकिस्तानसोबतचे सैन्य सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. या दौऱ्याचा उद्देश क्षेत्रीय सुरक्षा, सैन्य प्रशिक्षण सहकार्य आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करणे आहे. यापूर्वी तुर्कियेने 6 सैन्य विमानांमधून पाकिस्तानात शस्त्रास्त्रs पोहोचविली आहेत.

युद्धाच्या स्थितीत पाकिस्तानला तुर्कियेचे समर्थन मिळू शकते. तुर्किये या दाने काश्मीर मुद्द्यावर यापूर्वी अनेकदा पाकिस्तानची बाजू घेतली आहे. तुर्कियेने पाकिस्तानला मदत पुरविली तर भारताने या स्थितीकडे दुर्लक्ष करू नये असा इशारा राजनयिक जाणकार देत आहेत.

तुर्किये आणि पाकिस्तान यांच्यात 1950 च्या दशकापासूनच सैन्य संबंध राहिले असून दोन्ही देश धार्मिक विचारसरणीला याचा आधार मानतात. दोन्ही देशांचे वायुदल अनेकदा युद्धाभ्यास करत असते. तुर्किये नेहमीच पाकिस्तानला ‘इस्लामिक ब्रदर’ मानतो. पाकिस्तानी वायुदलाच्या वैमानिकांना तुर्कियेमध्ये लढाऊ विमानाच्या उ•ाणाचे प्रशिक्षण दिले जाते. याचबरोबर तुर्किये आणि पाकिस्तान संयुक्तपणे ड्रोन तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीम आणि स्मार्ट वेपनवर काम करत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article