For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेतान्याहू यांच्याविरोधात तुर्कीकडून अटक वॉरंट काढरणार

06:22 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेतान्याहू यांच्याविरोधात तुर्कीकडून अटक वॉरंट  काढरणार
Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

गाझाकडे जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नौका ताफ्याला रोखल्याप्रकरणी तुर्कीने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारने इंटरपोलमार्फत नेतान्याहू आणि आणखी एका इस्रायली अधिकाऱ्याविरुद्ध नोटीस जारी करण्याची विनंती केल्याचे  तुर्कीचे न्यायमंत्री अकिन गुर्लेक यांनी सांगितले.

मे 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत गाझा नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय जहाजी ताफ्याला इस्रायलने अडवल्याचा तुर्कीचा आरोप आहे. या प्रकरणात इस्तंबूलमधील एक न्यायालय पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासह अनेक इस्रायली अधिकाऱ्यांवर त्यांच्या अनुपस्थितीत खटला चालवत आहे. या आरोपांमध्ये नरसंहार, छळ, मानवतेविरुद्धचे गुन्हे, बेकायदेशीर अटक आणि जहाजांचे अपहरण यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. मात्र, इस्रायलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. नेतान्याहू यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यावरही तीव्र टीका केली आहे. तुर्कस्तानने उचललेले हे पाऊल राजकीय हेतूने उचलण्यात आले होते आणि त्याला कोणताही कायदेशीर आधार नव्हता, असा दावा नेतान्याहू यांनी केला आहे.

Advertisement

तुर्की-इस्रायलमधील तणाव वाढला

इस्रायल आणि तुर्की यांच्यात बऱ्याच काळापासून तणाव आहे. यापूर्वी, 2010 मध्ये इस्रायली कमांडोंनी गाझाकडे जाणाऱ्या पॅलेस्टाईन समर्थक जहाजी ताफ्यावर हल्ला करून 10 तुर्की नागरिकांना ठार केल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर गंभीर ताण आला होता. अलिकडच्या वर्षांत तुर्कस्तानने गाझा युद्ध आणि पॅलेस्टिनी प्रश्नावरून इस्रायलवर सातत्याने टीका केली आहे, तर इस्रायलने हे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून फेटाळून लावले आहेत.

Advertisement
Tags :

.