कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुर्कियेने पाकिस्तानला पुरविला शस्त्रास्त्रसाठा

06:00 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

Advertisement

भारतासोबत युद्ध होण्याच्या भीतीपोटी पाकिस्तानने तुर्कियेकडून शस्त्रास्त्रs मागविली आहेत. तुर्कियेमधून शस्त्रास्त्रांचा साठा घेऊन कार्गो फ्लाइट्स इस्लामाबाद येथे पोहोचली आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असताना तुर्कियेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रs पुरविण्याचे पाऊल उचलले आहे. तर तुर्किये येथे विध्वंसक भूकंप झाल्यावर सर्वप्रथम मदत पोहोचविणाऱ्या देशांमध्ये भारत सामील होता.

Advertisement

तुर्कियेच्या वायुदलाचे सी-130 हर्क्यूलिस सैन्य परिवहन विमान रविवारी कराची येथे पोहोचले, यात शस्त्रास्त्रs होती. तुर्कियेमधून कमीतकमी 6 सी-130 कार्गो विमाने इस्लामाबादमध्ये दाखल झाली आहेत. कराचीसोबत 6 सी-130 विमाने कथित स्वरुपात इस्लामाबादमध्ये एका सैन्यतळावर उतरली आहेत. तुर्किये आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी शस्त्रास्त्रांच्या हस्तांतरणाची पुष्टी दिली आहे. परंतु शिपमेंटमध्ये कुठली शस्त्रास्त्रs होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

यापूर्वी चीनने पाकिस्तानला पीएल-15 क्षेपणास्त्र  पाठविली आहेत, ही क्षेपणास्त्रs पाकिस्तानने स्वत:च्या जेएफ-17 लढाऊ विमानांमध्ये जोडली आहेत. तर तुर्कियेने पाकिस्तानला ड्रोन्स पाठविल्याचे मानले जात आहे.

तुर्कियेने पाकिस्तानला जी शस्त्रास्त्र  पाठविली आहेत, त्यात बायकतार टीबी2 ड्रोन, छोटी शस्त्रास्त्रs, स्मार्ट बॉम्ब आणि गायडेड क्षेपणास्त्र यंत्रणा सामील असू शकते. पाकिस्तान आणि तुर्कियेदरम्यान शस्त्रास्त्रांवरून करार झाले आहेत. काही दिवसांपूर्वी तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयप्प एर्दोगान हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होते, त्यादरम्यान दोन्ही देशांदरम्यान शस्त्रास्त्रांवरून करार झाला होता.

तुर्किये आणि पाकिस्तानने धार्मिक बंधुभावाच्या आधारावर स्वत:च्या मैत्रीला रणनीतिक भागीदारीत बदलण्याचा निर्णय घेतला होता. खासकरून भारताच्या विरोधात पाकिस्तानची मदत करण्यासाठी तुर्कियेने अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र करार केले आहेत. तुर्किये काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानची पाठराखण करत असतो.

दुसरीकडे पाकिस्तानी वायुदलाने भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान पेन्सी, स्कार्दू आणि स्वात समवेत प्रमुख वायुतळांना सक्रीय केले आहे. सध्या या तळांवर एफ-16, जे-10 आणि जेएफ-17 लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत, तसेच लढाऊ विमानांकडून गस्त घातली जात आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article