बावडा हॉकी मैदान 'टर्फ' चे काम बंद
कोल्हापूर :
कसबा बावड्यातील लाईन बझार येथील हॉकी पंढरीतील मैदानावर चालु असलेले टर्फ बसवण्याचे काम गेले तीन चार महिन्या पासुन बंद आहे. सध्या काम अर्धवट स्थितीत असून ते कधी पुर्ण होणार याची विचारणा आता खेळाडू मधुन होत आहे.
1997 पासून लाईन बझारच्या हॉकी खेळाडूचे स्वप्न असलेले टर्फ चे मैदान कुठेतरी सत्यात येतय, असे वाटत असतानाच सुरु असलेले काम गेले तीन चार महिन्यान पासुन बंद आहे. सध्या पालिकेकडे या मैदानासाठी आलेला 90 लाखाचा निधी पडून आहे. या 90 लाखा मधुन खेळाडूची बैठक व्यवस्था, मैदान चारही बाजुने बंदिस्त, मैदानासाठी गेट व चेंजिग रुम मधील टॉयलेट बाथरूम करण्यात येणार आहेत. सध्या पुढील निधी येई पर्यंत आलेल्या निधीतून प्रस्तावित कामे केली तर पुढील वेळ वाचणार आहे. पण ठेकेदाराकडून आज उद्या करत बंद ठेवलेले काम कधी सुरु होणार अशी विचारणा सध्या हॉकी पंढरीतुन होत आहे.
लाईन बाजार परिसरात इंग्रजांच्या काळापासूनच हॉकी हा खेळ रुजल्याने येथे घरटी हॉकीपटू आहेत. तर लाईन बझारात हॉकीचे तब्बल 15 संघ आहेत. सध्या या ठिकाणी हॉकी मैदान हे पूर्णपणे मातीचे होते.सध्या या मातीच्या मैदानावरच सराव करुन खेळाडूंनी राज्यभरातील संघांना टक्कर दिली आहे. महापालिकेच्या माध्यमातून 3 कोटी रूपयांचे टर्फ बसवले जाणार आहे. यासाठी सध्या अलीकडेच या मैदानावर प्रथम मोठी व नंतर लहान अशा दोन प्रकारच्या खडी चा थर करण्यात येऊन त्यावर डांबरीकरणाचा थरही केला आहे. यानंतर या थरावर अत्याधुनिक असे टर्फ बसवले जाणार आहे. यासाठी थायलंडमधील तीन कंपन्यांकडून कोटेशन मागण्याचे काम महापालिकेकडून सुरु आहे.
कोल्हापुरात मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर टर्फ बसविण्यात आले असुन आता लाईन बाजार हॉकी मैदानावरही टर्फ बसविण्यात येणार आहे. मात्र हे काम गेल्या तिन चार महिन्यापासून बंदच आहे. त्यामुळे या मैदानात होणाऱ्या अनेक स्पर्धा गेले दोन वर्ष तरी झालेल्या नाहीत.यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे.
आजपर्यंत येथील शेकडो खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत तर तीसहून अधिक खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धा या महाराष्ट्र संघातून खेळल्या आहेत. या खेळाच्या जोरावर अनेक तरुणांना पोलीस, रेल्वे, शिक्षण, बँका, सहकारी संस्था अशा अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक खेळाडू जिल्हा, राज्य व देश पातळीवर चमकले आहेत.
माजी नगरसेवक व शिंदेसेनेचे नेते सत्यजित कदम यांनी खेळाडूंच्या मागणीनुसार टर्फ बसवण्यासाठी महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी-सुविधा यातून लाईन बाजार हॉकी मैदानासाठी शासनाच्या नगरविकास खात्याकडे निधीची मागणी केली.व त्यानुसार पहिल्या टप्प्यात दीड कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात 70 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.टप्प्याटप्प्याने मिळत राहिलेल्या पैशातून महापालिकेने गतवर्षापासून टर्फ बसण्यासाठीचा अवश्यक बेस करुन त्यावर लहान व मोठी खडी टाकुन डांबरीकरणाचा थर ही टाकला आहे. या थरावर आता फक्त रबरचा थर करुन त्यावर टर्फ बसवने बाकी आहे. त्याच बरोबर टर्फ मैदानासाठी अवश्यक असलेल्या इतर सुविधा ही बाकी आहेत.टर्फ बसवण्यासाठी नगरविकास खात्याकडूनच तीन कोटी रुपयांच्या निधी महापालिका मिळवणार आहे.
- पूर्ण झालेली कामे
- मुळात मैदान लहान असल्याने बैठक व्यवस्थेचा काही भाग हटवून मैदानासाठी अवश्यक 94 मीटर लांब आणि 55 मीटर रुंद असा आकारात मैदाना करुन घेतले.
- पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून मैदानाच्या भोवतीने दीड फुट रुंदीचे अंडर ग्राउंड गटार पूर्ण आहेत.
- अपूर्ण असलेली कामे
- मैदानात लाईटची व्यवस्था.
- ट्रेसिग रुम मधील टॉयलेट बाथरूम,व्यासपीठ,बैठक व्यवस्था,गेट,मैदान बंदिस्त करणे. लहान खडीचा डांबरी लेअर, रबर लेअर व टर्फ बसवण्याचे काम शिल्लक आहे.