तुळसुलीच्या अपूर्वा कामतचे राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत यश
कुडाळ -
दीप फाउंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत शिरवल - कणकवली येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजची विद्यार्थिनी अपूर्वा विनायक कामत हिने तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. अपूर्वा मूळ कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील असून सध्या ती पेडणे - गोवा येथे स्थायिक झाली आहे. तसेच शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजमध्ये बी फार्मसी च्या शेवटच्या वर्षात ती शिकत आहे. राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. 'सजीव पेशींच्या केंद्रात असलेले रसायन जे प्रत्येक पेशीची रचना आणि उद्देश ठरविते. पुनरुत्पादन होतात याव्दारे आनुवंशिक माहिती पुढे नेली जाते. अशा क्रांतिकारक अज्ञात न्यायवर्धक डि.एन.ए. पॅथॉलॉजीच्या थीमवर तिने या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून अपूर्व असे यश प्राप्त केले.तिला पुणे येथे रोख रक्कम, प्रमाणपत्र चषक (ट्रॉफी) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.आपल्या या यशामागे वडील विनायक कामत आई सौ.साक्षी कामत तसेच कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापका कॉलेज मधील मित्रमंडळी यांचे प्रोत्साहन मिळाले. म्हणूनच आपण हे यश प्राप्त करू शकले, असे अपूर्वा सांगते.