तुळशी विवाहाला आजपासून प्रारंभ
11:04 AM Nov 24, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बाजारात तुळशी वृंदावन, पूजेच्या साहित्याची रेलचेल
Advertisement
बेळगाव : शहर आणि परिसरात शुक्रवार दि. 24 पासून तुळशी विवाहांना प्रारंभ होणार आहे. त्यामुळे बाजारात तुळशी वृंदावन आणि तुळशीच्या पूजेच्या साहित्याची मागणी वाढू लागली आहे. बाजारात तुळशीच्या विवाहाचे साहित्य, तुळशी वृंदावन, रंग, फुले, हार आणि इतर साहित्याची लगबग पाहावयास मिळत आहे. यंदा तुळशी विवाह दि. 24, 25, 26 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहेत. शहरात काही ठिकाणी सामुदायिक तुळशी विवाहाचे सोहळे पार पडणार आहेत. यासाठी पूजा आणि सजावट साहित्याची खरेदी बाजारात होऊ लागली आहे. तुळशी विवाहानंतर लग्न सराईला प्रारंभ होत आहे. बाजारात तुळशी विवाहासाठी चिंच, आवळे, ऊस, अंबोती, नाडापुडी, हार, फुले आणि फळांची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विविध प्रकारची फळेही दाखल झाली आहेत.
Advertisement
Advertisement
Next Article