For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Tulja Bhavani Temple | तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी जाताय? सावधान! 'या' दोन तरुणांचा कारनामा समोर आल्यानंतर मंदिर प्रशासन खडबडून जागं

03:01 PM Jun 07, 2026 IST | NEETA POTDAR
tulja bhavani temple   तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी जाताय  सावधान   या  दोन तरुणांचा कारनामा समोर आल्यानंतर मंदिर प्रशासन खडबडून जागं
Advertisement

Advertisement

तुळजापूर - सध्या सुरू असलेल्या अधिक मासामुळे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक तुळजापूर येथे येत आहेत. या वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांची कोणतीही आर्थिक किंवा धार्मिक फसवणूक होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत.

भाविकांना केवळ अधिकृत पुजाऱ्यांकडूनच धार्मिक विधी आणि पूजा कराव्यात, या उद्देशाने प्रशासनाने अनधिकृत पुजाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडली आहे. विशेष पथकाची स्थापना आणि कारवाई अनधिकृतपणे पुजारी व्यवसाय करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मंदिर प्रशासनाने एक विशेष पथक तैनात केले आहे. या पथकात सहायक व्यवस्थापक (धार्मिक), सुरक्षा निरीक्षक, एसआयएसपीएल कंपनीचे सुरक्षा पर्यवेक्षक आणि मंदिर संस्थानच्या दोन शिपायांचा समावेशआहे.

Advertisement

हे पथक मंदिर परिसरात चोवीस तास गस्त घालत आहे. पथकाने तपासणीदरम्यान अमर वसंतराव शेळके, रवी दत्तात्रय शिरसाट हे दोन तरुण मंदिर परिसरात अनधिकृतपणे भाविकांचे धार्मिक विधी करून घेत असल्याचे रंगेहात पकडले. शिस्तभंगाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही व्यक्तींच्या कृतीमुळे मंदिरातील शिस्त, नियम आणि व्यवस्थापनाला बाधा पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले. मंदिर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी तातडीने तुळजापूर पोलीस ठाण्यात स्वाधीन केले आहे. कारवाईमुळे अनधिकृतपणे भाविकांना ठगणाऱ्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. भाविकांनीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे न देता अधिकृत पुजाऱ्यांशीच संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Tags :

.