Food Adulteration | तुकाराम मुंढेंचा धडाका; अन्न भेसळ माफियांना बसला दणका!
गोडोली : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पदी तुकाराम मुंढे यांची निवड झाल्यापासून महाराष्ट्रातील अन्न भेसळ माफियांना पळता भुई थोडी झाली आहे. प्रशासनाने सुरू केलेल्या धडक कारवायांच्या धास्तीने जिल्ह्यातील बेकरी, किराणा दुकाने आणि मोठ्या मॉ ल्समधून अनेक रंगीबेरंगी व चवदार अन्नपदार्थ हळूहळू गायब झाले आहेत. दुकानदारांनी हे संशयास्पद पदार्थ काऊंटरवर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांचा त्यांच्या गुणवत्तेवरील संशय आता अधिकच बळावला आहे.
पोटापेक्षा जिभेचे चोचलेपुरवण्यासाठी उत्पादकांनी आकर्षक, चविष्ट आणि लहान-लहान पॅ किंगमधील पदार्थ बाजारात आणले होते. या पदार्थांची गुणवत्ता, दर्जा आणि त्यातील घटक इतक्या बारीक अक्षरांत छापलेले असायचे की तेवाचता ही येत नाही. केवळ चांगल्या चवीच्या जोरावर या पदार्थांची प्रचंड विक्री होत होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हे चवदार पदार्थ अचानक गायब झाले आहेत. 'ओरिजिनल' रंगात पदार्थ उपलब्ध प्रशासनाच्या भीतीमुळे अन्नात अनधिकृत रंग टाकण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. पूर्वी भडक दिसणारा फ्राईड राईस' 'चायनीज आता पांढरा शुभ्र दिसू लागला आहे. तर विविध कृत्रिम रंगांत मिळणारे मसाल्याचे पदार्थ आता त्यांच्या मूळ नैसर्गिक रंगात बाजारात दिसू लागले आहेत.