For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

MPSC सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती नाहीच; सौरभ कटियार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

04:47 PM Oct 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
mpsc सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती नाहीच  सौरभ कटियार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
Advertisement
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) सचिवपदाची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपवली जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी प्रशासकीय कारणास्तव १ ऑक्टोबर २०२६ पासून संपुष्टात आणण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

एमपीएससी सचिवपदासाठी तुकाराम मुंढे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती झालेली नाही. सध्या सौरभ कटियार हे अतिरिक्त कार्यभार सांभाळणार आहेत.

या निर्णयामुळे एमपीएससीच्या प्रशासकीय नेतृत्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, सचिवपदावर पुढे कायमस्वरूपी नियुक्ती कोणाची होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement

.