पाकिस्तानशी आर‑पार युध्दाच्या मूडमध्ये टीटीपी
हिजबुल्लाहप्रमाणे निर्माण करणार क्षेपणास्त्र : शांतता चर्चेचा प्रस्ताव धुडकावला
वृत्तसंस्था, क्वेटा
स्वत:च्या संचालनात्मक क्षमतेच्या विस्तारासाठी क्षेपणास्त्रs निर्माण करणार असल्याची घोषणा तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) केली आहे. तहरीक-ए-तालिबानचा हा प्रयत्न हिजबुल्लाह आणि हुतीसारख्या इराणच्या प्रॉक्सी संघटनांप्रमाणे असून त्यांच्याकडे रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रs आहेत. टीटीपीची ही घोषणा पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रs प्राप्त करणार किंवा त्यांना विकसित करणार असल्याची पुष्टी टीटीपीने दिली आहे.
याचबरोबर टीटीपीने पाकिस्तान सरकारसोबत शांतता चर्चा धुडकावत असल्याची घोषणा केली आहे. टीटीपी क्षेपणास्त्र प्रणाली प्राप्त करण्यासाठी वेगाने काम करत आहे. आम्ही आमची संचालनात्मक क्षमता अपग्रेड करणार आहोत असे टीटीपीचा प्रवक्ता मोहम्मद खोरासानीने म्हटले आहे. टीटीपीने ही क्षमता प्राप्त केली तर पाकिस्तानात आगामी काळात क्षेपणास्त्र हल्ले होण्याची शक्यता वाढणार आहे.
टीटीपीत नेतृत्वाची रचना
टीटीपी दोन दशकांपासून एका संघटित शत्रूशी लढत आहे, याचमुळे टीटीपीच्या लिडरशिप कौन्सिल (शूरा) संघटनेच्या रचनेत दरवर्षी छोटे-मोठे बदल केले जात असतात.स्थितीनुसार पात्र लोकांना वेगवेगळ्या पदांवर नियुक्त करण्यात येते. यामुळे सदस्यांमध्ये नव्या ऊर्जेसोबत स्वत:च्या कार्यांना चालविण्याचे वातावरण तयार होते. वेगवेगळ्या लोकांसोबत संघटनेची रचना करण्यात आली असून यामुळे नुकसान झाल्यावर संबंधित लोकांची त्वरित नियुक्ती होऊ शकणार असल्याचे टीटीपीच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. टीटीपीचे हे धोरण इराणच्या रणनीतिसमान आहे.
पाकिस्तानकडून अत्याचार
दशकांपासून पाकिस्तानच्या सत्तावर्तुळाने काही खास परिवारांच्या लाभासाठी पश्तून, बलूच, पाकव्याप्त काश्मिरींच्या अधिकारांची मुस्कटदाबी केली आहे. तेथील साधनसामग्रीची लूट करत रक्तपात घडवून आणला आहे. पाकव्याप्त काश्मीरसमवेत पूर्ण पाकिस्तानात याविरोधात जागरुकता वाढली आहे. याचमुळे लोक वेळोवेळी पाकिस्तान सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. पाकिस्तानचे सैन्यच पाकिस्तानच्या सर्व समस्यांचे मूळ आहे. टीटीपीचा प्रभाव पाकिस्तानसह पीओकेतही फैलावलेला आहे. याचमुळे टीटीपीने पीओकेला एक प्रांत घोषित करत एक ‘वली’ (गव्हर्नर) नियुक्त केला असल्याचा दावा खोरासानीने केला आहे.
टीटीपीची नवी भूमिका
?ड्रोननंतर आता अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळविल्याचा दावा
?पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारचा करार, युद्धविरामास नकार
पाकविरोधात युद्ध
?चर्चेद्वारे शरणागती पत्करविण्याचे धोरण पूर्णपणे अपयशी
?खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तानात सैन्यावरील हल्ले तीव्र
भारतासाठी चिंता
?पाकिस्तानच्या आण्विक तळांवरून जागतिक समुदाय चिंतेत
?अफगाणिस्तान सीमा, भारत-पाक क्षेत्रात तणाव वाढणार
टीटीपी संघटनेत बदल
?तहरीक-ए-तालिबानने दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली प्राप्त करण्याच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षेविषयी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे.
? पाकिस्तानसोबतची शांतता चर्चा धुडकावून लावल्याचे टीटीपी प्रवक्ता मोहम्मद खोरासानीने एका आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या मुलाखतीत सांगितले आहे.
?टीटीपीने स्वदेशी स्वरुपात विकसित करण्यात येणाऱ्या स्वत:च्या क्षेपणास्त्राचे नाव ‘अल-फारुक’ ठेवल्याची माहिती खोरासानी यांनी दिली आहे.
? क्वाडकॉप्टर आणि थर्मल इमेजिंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात करत असल्याचे टीटीपीचे सांगणे आहे.
?टीटीपी अत्यंत धोकादायक अन् क्रूर दहशतवादी संघटना असून आतापर्यंत पाकिस्तानच्या हजारो सैनिकांचा जीव घेतला आहे.