For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मध्यप्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याचा प्रयत्न

05:54 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
मध्यप्रदेशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याचा प्रयत्न
Advertisement

अखिलेश यादव यांच्याकडून राज्यात जोरदार प्रचार

Advertisement

समाजवादी पक्षाला मध्यप्रदेशच्या राजकारणात फार मोठे स्थान नाही. तरीही राज्यात होत असलेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपनंतर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचे स्वप्न सपने पाहिले आहे. सप प्रमुख अखिलेश यादव याकरता राज्यात ठाण मांडून आहेत. काँग्रेसचे पाठबळ मिळवून राज्यात स्वत:ला मजबूत करण्याची सपची रणनीति होती. परंतु ऐनवळी काँग्रेसने आघाडी करण्यास नकार देत अखिलेश यादव यांच्या रणनीतिला सुरुंग लावला होता.

मध्यप्रदेशात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच होणार आहे. परंतु सप देखील या लढतीत स्वत:ला सामील करू पाहत आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजपइतका सपचा प्रभाव नाही, परंतु बसपनंतर राज्यातील चौथी शक्ती सप ठरू शकते. बुंदेलखंड विशेषकरून उत्तरप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या टीकमगड आणि निवाडी जिल्ह्यांमध्ये पक्षाची मतपेढी आहे. सपने सर्वात चांगली कामगिरी 2003 च्या निवडणुकीत केली होती. तेव्हा पक्षाचे 7 आमदार निवडून आले होते.

Advertisement

विंध्य अन् बुंदेलखंडमध्ये प्रभाव

उत्तरप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या विंध्य आणि बुंदेलखंडमध्ये सपचा प्रभाव आहे. बुंदेलखंड क्षेत्रातच 26 जागा असून हे क्षेत्र इटावाला लागून ओ. 2018 मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता, परंतु बहुमतापासून दूर राहिला होता. अशा स्थितीत काँग्रेसने बसप आणि सप आमदारांच्या सहकार्यातून सरकार स्थापन केले होते. मागील निवडणुकीत सपला 1.30 टक्के मते मिळाली होती.

काँग्रेसकडून सपची उपेक्षा

मध्यप्रदेशात काँग्रेसने सपला जागा न देण्याची भूमिका घेत पक्षाची उपेक्षा केली आहे. काँग्रेसने आमच्यामुळे अनेकदा स्वत:चे सरकार वाचविले आहे तरीही काँग्रेस आम्हाला दुर्लक्षित करत असल्याची तक्रार सपच्या वरिष्ठ नेत्याने केली आहे. कमलनाथ यांचे वक्तव्य सप नेतृत्वाला बोचले असून याचमुळे पक्षाने मध्यप्रदेशात स्वत:ची शक्ती दाखवून देण्याचा निर्धार केला आहे. आम्ही राज्यात तिसरी मोठी शक्ती होऊ इच्छितो. याच उद्देशाने सप प्रमुख मैदानात उतरले आहेत. सपला राज्यात मोठे प्रेम मिळत असल्याचा दावाही या नेत्याने केला आहे. समाजवादी पक्षाने मागील निवडणुकीत एका जागेवर यश मिळविले होते. तर 5 जागांवर दुसऱ्या तर 4 जागांवर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती.

काँग्रेस नाइच्छुक

विंध्यमधील मैहर मतदारसंघात काँग्रेस 2984 मतांनी पराभूत झाला होता. याच मतदारसंघात सप उमेदवाराला 11,202 मते मिळाली होती. बालाघाट, गूढ समवेत 5 जागांवर सप उमेदवार दुसऱ्या स्थानी तर काँग्रेस तिसऱ्या स्थानावर राहिला होता. निवाडी मतदारसंघात सप दुसऱ्या तर काँग्रेस चौथ्या स्थानावर होता. यातून पक्षाचा जनाधार वाढत असल्याचे दिसून येते. परंतु काँग्रेसला सपसोबत आघाडी करण्याची इच्छा नाही असे सप नेत्याने म्हटले आहे.

किंगमेकर ठरण्याची अपेक्षा

समाजवादी पक्ष यावेळी चांगली कामगिरी करत किंगमेकर ठरणार अशी अपेक्षा अखिलेश यादव यांना आहे.  अखिलेश यादव यांच्याकडे उत्तरप्रदेशात 2027 मध्ये स्वत:च्या पक्षाला सत्तेवर आणण्याची संधी आहे. याचमुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीत सहभाग घेतला आहे. परंतु या आघाडीमध्ये आता अडचणी उभ्या राहत आहेत. यामुळे अखिलेश हे स्वत:च समर्थकांना पक्ष राष्ट्रीय स्तरावर विस्तार करत असल्याचा संदेश देऊ पाहत आहेत.

Advertisement
Tags :

.