For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करा

11:21 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
शाळांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करा
Advertisement

तालुकास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : सरकारी शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शाळेचे माजी विद्यार्थी तसेच देणगीदारांच्या सहकार्यातून सरकारी शाळांमध्ये ‘आमची शाळा, आमची जबाबदारी’ हे अभियान राबविले जात आहे. शिक्षकांनी हे अभियान प्रत्येक गावापर्यंत पोहोचवून शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. शुक्रवारी गांधीभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर भुतरामहट्टी मुक्तीमठाचे शिवसिद्ध सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी, जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, ग्रामीण गटशिक्षणाधिकारी एस. पी. दासपन्नावर, बीआरसी एम. एस. मेदार, राज्य हायस्कूल सहशिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामू गुगवाड, डाएटचे प्राचार्य बसवराज नलतवाड यासह इतर उपस्थित होते.

सभागृह पडले अपुरे

Advertisement

गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला संपूर्ण तालुक्यातून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थी तसेच शाळांचे पदाधिकारी उपस्थित राहिल्याने सभागृह अपुरे पडले. बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने शेकडो शिक्षक सभागृहाबाहेर होते. त्यामुळे यापुढील काळात सर्व शिक्षकांना बसता येईल अशा सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्याची मागणी शिक्षकांमधून केली जात होती.

विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण

शैक्षणिक जिल्ह्यात एसएसएलसी परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप तसेच मध्यान्ह आहार मदतनीसांना गणवेशाचे वाटप हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात आला. याबरोबरच आदर्श शिक्षक व आदर्श शाळांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisement
Tags :

.