शाहिदसोबत झळकणार तृप्ति डिमरी
तृप्ति डिमरी आणि शाहिद कपूर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. दोन्ही कलाकार विशाल भारद्वाज यांच्या ‘अर्जुन उस्तरा’ या चित्रपटात काम करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण 6 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या चित्रपटासाठी एक मोठा स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अंडरवर्ल्डवर आधारित आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे. तृप्ति डिमरीसाठी चालू वर्ष अत्यंत चांगले राहिले आहे. आता ती पुढील वर्षासाठी विशेष तयारी करत आहे. चालू वर्षात तिचे अनेक चित्रपट गाजले आहेत. यात विक्की विद्या का वो वाला वीडियो, बॅड न्यूज, भूल भुलैया 3 सामील आहेत. तर आता ती शाहिद कपूरसोबत आगामी चित्रपट अर्जुन उस्तराच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. शाहिद कपूरचा देवा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.