तृप्ति अन् माधुरी पुन्हा येणार एकत्र
तृप्ति डिमरी सध्या चर्चेत आहे. मागील वर्षी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘भूल भुलैया 3’ने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळविले होते. या चित्रपटात तृप्ति पहिल्यांदाच माधुरी दीक्षितसोबत झळकली होती. चित्रपटात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होता आणि अनीस बज्मी यांनी याचे दिग्दर्शन केले होते. तृप्ति आणि माधुरीची जोडी आता पुन्हा प्रेक्षकांना रोमांचित करण्यासाठी तयार आहे. दिग्दर्शक सुरेश त्रिवणी आता ‘मां बहन’ नावाचा एक विनोदी चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात माधुरी अन् तृप्ति मुख्य भूमिकेत असतील. हा चित्रपट विक्रम मल्होत्राच्या प्रॉडक्शन हाउसकडून निर्माण केला जाणार आहे. तसेच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटात रवि किशन आणि धारणा दुर्गा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसून येतील. मी चालू वर्षात स्वत:ला एक मोठे आव्हान स्वीकारणार आहे. नव्या चित्रपटात मी आव्हानात्मक भूमिका साकारणार असल्याचे माधुरीने म्हटले आहे. तर तृप्ति पुढील काळात विशाल भारद्वाज यांचा आगामी चित्रपट ‘अर्जुन उस्तरा’मध्ये शाहिद कपूरसोबत दिसून येणार आहे.