For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांच्या पुत्रांच्या कंपनीला युद्धाचा लाभ

06:46 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांच्या पुत्रांच्या कंपनीला युद्धाचा लाभ
Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र एरिक आणि डोनाल्ड ज्युनियर यांची गुंतवणूक असलेली फ्लोरिडाची ड्रोन कंपनी पावरस ही आखाती देशांना स्वत:चे ड्रोन विकण्याचा प्रयत्न करत आहे. हे देश इराणच्या हल्ल्यांमुळे प्रभावित असून अमेरिकेच्या सैन्यावर निर्भर आहेत. कंपनीने या देशांमध्ये ड्रोन डेमोद्वारे स्वत:चे संरक्षणात्मक ड्रोन दाखविले असून ते इराणी हल्ल्यांपासून सुरक्षा पुरवू शकतात असा दावा करण्यात आला आहे. ट्रम्प यांचे पुत्र युद्धस्थितीचा लाभ उचलू पाहत असल्याची टीका आता केली जात आहे.  अमेरिकेच्या ड्रोन तंत्रज्ञानाला चीन आणि रशियापेक्षा आघाडीवर ठेवायचे असल्याचा दावा संबंधित कंपनीने केला आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.