For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांची इराणला लास्ट वॉर्निंग

06:45 AM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांची इराणला लास्ट वॉर्निंग
Advertisement

हल्ला करू नका, नाही तर अभूतपूर्व पाऊल उचलू

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. इराणने हल्ला केलातर अमेरिका अधि शक्तिनिशी हल्ला करणार असल्याचे ट्रम्प यांनी रविवारी म्हटले आहे. तर यापूर्वी इराणने अमेरिकेवर सर्वात मोठा हल्ला करण्याची धमकी दिली होती.

अमेरिका प्रत्युत्तरादाखल आणखी मोठा हल्ला करणार आहे. इराणने आताच अत्यंत जोरदार हल्ला करणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु इराणने असे करू नये. कारण त्यांनी असे केल तर आम्ही त्यांच्यावर अशा शक्तिनिशी हल्ला करू जो पूर्वी कधीच पाहिला गेला नव्हता असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडियावर म्हटले आहे.

Advertisement

संयुक्त राष्ट्रसंघात मुद्दा

संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव एंटोनियो गुतेरेस यांनी इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्याची निंदा केली आणि क्षेत्र तसेच पूर्ण जगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले. स्थिती आणखी बिघडण्यापासून रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जावेत असे गुतेरेस यांनी आपत्कालीन बैठकीत म्हटले आहे.

अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे गुतेरेस म्हणाले. तसेच इराक, जॉर्डन, बहारीन, कुवैत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडत्वाचे उल्लंघन केल्याप्रकरणी  इराणची त्यांनी निंदा केली.

अमेरिकेकडून निर्णयाचा बचाव

अमेरिकेची सैन्य कारवाई वैध होती. इराण अण्वस्त्रs बाळगू शकत नाही. हा राजकारणाचा विषय नाही तर जागतिक सुरक्षेचा आहे आणि याच उद्देशाने अमेरिका कायदेशीर कारवाई करत असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे प्रतिनिधी माइक वॉल्टज यांनी केला आहे. तर इस्रायलचे प्रतिनिधी डॅनी डॅनन यांनी हवाई हल्ल्यांचा बचाव करत अस्तित्वावरील सकट रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.