For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नोबेल न मिळाल्याने ट्रम्प यांची नाराजी

06:51 AM Oct 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
नोबेल न मिळाल्याने ट्रम्प यांची नाराजी
Advertisement

► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला हा पुरस्कार न देऊन नॉर्वेने स्वत:वर कधीही न पुसला जाणारा डाग लावून घेतला असे ट्रम्प म्हणाले. तसेच या निर्णयाला लज्जास्पद आणि अपमानकारक संबोधत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्यामुळे अनेक युद्धे टळल्याचा दावाही केला. टाळलेल्या प्रत्येक युद्धासाठी आपल्याला आठ वेळा हा पुरस्कार मिळायला हवा होता, असेही ट्रम्प म्हणाले.

2026 या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त राष्ट्रांच्या माजी मानवाधिकार प्रमुख भारतवंशीय नवी पिल्लय यांना जाहीर झाला आहे. मात्र, नवी पिल्लय यांना कोणीही ओळखत नसल्याचे वक्तव्यही ट्रम्प यांनी केला. याचवेळी ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचे श्रेय पुन्हा एकदा घेतले आहे. दोन अण्वस्त्रधारी देशांना युद्धात जाण्यापासून रोखून आपण 5 कोटी लोकांचे प्राण वाचवले. आता आपण इराण आणि रशिया-युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठीही काम करत आहे, असेही स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.