For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांच्या कन्येला ताजमहालची भुरळ

06:41 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांच्या कन्येला ताजमहालची भुरळ
Advertisement

पतीसमवेत भारत दौऱ्यावर : अक्षरधाम मंदिरालाही भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, आग्रा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या टिफनी ट्रम्प सध्या पती मायकल बोलस यांच्यासोबत भारत दौऱ्यावर आहे. या दाम्पत्याने शनिवारी आग्रा येथील ताजमहाल आणि दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट दिली. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी त्यांचे भारतात स्वागत केले.  टिफनी ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ताजमहाल आणि अक्षरधाम मंदिराला दिलेली भेट हा एक अद्भूत अनुभव असल्याचे वर्णन केले आहे. त्यांच्या ताजमहाल भेटीचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Advertisement

टिफनी ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी मार्ला मॅपल्स यांची मुलगी आहे. त्या 2012 मध्ये मायकल बोलस यांच्याशी विवाहबंधनात अडकल्या होत्या. त्यांनी ताजमहाल परिसरात सुमारे एक तास घालवला. ताजमहालच्या सौंदर्याने टिफनी खूप आनंदित झाली होती. प्रेमाचे प्रतीक आणि जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालला भेट देण्यासाठी शनिवारी एक विशेष पाहुणी आग्रा येथे दाखल झाली. पूर्वनियोजित वेळापत्रकात अचानक बदल करून टिफनीचा ताफा थेट ताजमहालकडे गेल्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.

वेळापत्रकात अचानक बदल, थेट ताजमहालकडे कूच

टिफनी ट्रम्प आणि त्यांचे पती मायकल यांना सुरुवातीला त्यांच्या हॉटेलमध्ये जायचे होते, परंतु ताजमहाल जवळून पाहण्याच्या त्यांच्या उत्सुकतेमुळे त्यांच्या ताफ्याला थेट ताजमहालकडे वळवण्यात आले. हे व्हीआयपी जोडपे गोल्फ कार्टमधून ताजमहाल संकुलात दाखल झाले तेव्हा, टिफनीने हात जोडून उपस्थितांना अभिवादन केले. सर्वांचे आभार व्यक्त केले. या भेटीदरम्यान अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर हे देखील उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.