For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

USA Iran Tension | होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण आमनेसामने; जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण

05:17 PM Jul 14, 2026 IST | NEETA POTDAR
usa iran tension    होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण आमनेसामने  जागतिक ऊर्जा बाजारात चिंतेचे वातावरण
Advertisement

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे आता पाहायला मिळत आहे.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या मालवाहू जहाजांवर 20 टक्के सुरक्षा शुल्क आकारण्याचा आणि इराणी बंदरांवरील सागरी निर्बंध पुन्हा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या घोषणेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात चिंता वाढली असून, कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अद्याप संपायचे नाव घेत नाहीये.ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिका सांभाळत असल्याचा दावा करत, त्या बदल्यात या मार्गाचा वापर करणाऱ्या जहाजांकडून सुरक्षा शुल्क आकारले जाईल, असे स्पष्ट केले. या शुल्कातून मिळणारा निधी सागरी सुरक्षा व्यवस्थेसाठी वापरला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ट्रम्प यांच्या भूमिकेला इराणने तीव्र विरोध दर्शवला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी होर्मुझ सामुद्रधुनीच्या सुरक्षेचा अधिकार इराणचाच असल्याचे सांगत, अमेरिकेचा कोणताही हस्तक्षेप आपल्या सार्वभौमत्वावर आघात मानला जाईल, असा इशारा दिला आहे.

Advertisement

या घडामोडींचा परिणाम भारतासह अनेक इंधन आयातदार देशांवर होण्याची शक्यता आहे. भारतात येणाऱ्या कच्च्या तेलाचा आणि एलएनजीचा मोठा हिस्सा होर्मुझ सामुद्रधुनीतून येत असल्याने, अतिरिक्त शुल्क लागू झाल्यास आयात खर्च वाढू शकतो. परिणामी पेट्रोल-डिझेलच्या किमती, वाहतूक खर्च आणि महागाईवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.