For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रम्प यांची व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षांना धमकी

06:55 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रम्प यांची व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षांना धमकी
Advertisement

अमेरिकेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला

Advertisement

वृत्तसंस्था/ कराकस, वॉशिंग्टन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांना गंभीर परिणामांची धमकी दिली आहे. जर डेल्सी यांनी व्हेनेझुएलासाठी अमेरिकेला जे योग्य वाटते ते केले नाही तर त्यांची अवस्था मादुरेंपेक्षाही वाईट होऊ शकते, अशा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, रॉड्रिग्ज यांनी मादुरो यांना सत्तेवरून हटवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. तसेच अमेरिकेकडे त्यांनी मादुरो यांना परत पाठवण्याची मागणी केली आहे.

Advertisement

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘द अटलांटिक’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत व्हेनेझुएलाला गंभीर शब्दात खडसावले आहे. यापूर्वी, न्यूयॉर्क पोस्टला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी सावध पवित्रा घेतला होता. रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेचे ऐकले तर व्हेनेझुएलामध्ये अमेरिकन सैन्य तैनात करण्याची गरज भासणार नाही, असे म्हटले होते. दरम्यान, व्हेनेझुएलावर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर प्रथमच ‘युएनएससी’ची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना ताब्यात घेण्याच्या कायदेशीरतेवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकेच्या सहकार्याचे डेल्सी यांचे आवाहन

व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अमेरिकेला सहकार्याचे आवाहन केले आहे. व्हेनेझुएलाला विकास आणि शांततेसाठी अमेरिकेसोबत एक सहयोगी अजेंडा तयार करायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. व्हेनेझुएलातील लोक युद्धाला नव्हे तर शांतता आणि संवादाला पात्र आहेत. अध्यक्ष मादुरो यांचा शांततेचाच संदेश होता आणि आजही सर्व व्हेनेझुएलाचा हाच संदेश असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.

अमेरिकेच्या लष्करी कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक झाली असूनही, व्हेनेझुएला संघर्षाला नव्हे तर संवाद आणि सहकार्याला प्राधान्य देतो. दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत एकत्र काम करावे, असे निवेदनही रॉड्रिग्ज यांनी केले आहे.

मादुरो यांना अमेरिकन न्यायालयात हजर करणार

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना मॅनहॅटनमधील संघीय न्यायालयात हजर केले जाणार आहे. मादुरो यांच्यावर अमेरिकेत शस्त्रास्त्रs आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे आरोप आहेत. शनिवारी, मादुरो यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले असून त्यांच्यावर अपहरण आणि खून करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आहे. मादुरो यांनी अमली पदार्थांच्या तस्करीत कोणताही सहभाग असल्याचे नाकारले आहे. त्यांच्या खटल्याला सुरुवात होण्यास अनेक महिने लागू शकतात. 2 जानेवारीच्या रात्री अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर हल्ला करत मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना न्यूयॉर्कला आणण्यात आले. सध्या त्यांना एका तुरुंगात ठेवण्यात आले आहे. आता त्यांच्यावर शस्त्रs आणि ड्रग्जशी संबंधित आरोपांवर खटला चालवला जाईल.

Advertisement
Tags :

.