कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्रंप यांची हार्वर्डवर कठोर कारवाई

06:03 AM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

► वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी

Advertisement

अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कठोर कारवाई केली आहे. या विद्यापीठाचा ‘करमुक्त’ दर्जा काढून घेण्यात आला आहे. या विद्यापीठाने इस्रालयविरोधी आंदोलनात बघ्याची भूमिका बजावली होती. या आंदोलनांना छुपा पाठिंबा देण्याचे काम या विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने केले होते, असा आरोप आहे. त्यामुळे हे विद्यापीठ अमेरिकेच्या हितांच्या विरोधात कार्य करीत आहे, असा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या कारवाईचे ठाम समर्थन शुक्रवारी केले. हार्वर्ड विद्यापीठावर त्याच्या योग्यतेप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. अशी कारवाई केली जाणे अत्यावश्यक आहे. या विद्यापीठाने अमेरिकेशी निष्ठा राखलेली नाही. त्यामुळे ते कारवाईस पात्र आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. या विद्यापीठाची अनुदानेही बंद केली जातील, असे संकेत ट्रंप यांनी मागच्या आठवड्यात दिले होते. तेही लवकरच पूर्ण केले जाणार आहे.

इतर विद्यापीठांवरही कारवाई होणार

केवळ हार्वर्ड विद्यापीठच नव्हे, तर डोनाल्ड ट्रंप प्रशासनाच्या रडावर अमेरिकेतील इतर अनेक विद्यापीठे आणि शिक्षणसंस्थांवरही कारवाईची कुऱ्हाड चालविण्याची योजना ट्रंप यांनी सज्ज केली आहे. 2023 मध्ये हमास या दहशतवादी संघटनेने इस्रालयमध्ये घुसखोरी करुन अनेक माणसे ठार मारली होती. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला चढविला होता. हे युद्ध अद्यापही होत आहे. इस्रायलच्या कारवाईच्या विरोधात अमेरिकेतील अनेक विद्यापीठांमध्ये हिंसक विरोध प्रदर्शने झाली होती. या प्रदर्शनांमध्ये या विद्यापीठांमधील असंख्य मुस्लीम विद्यार्थ्यांनी उग्र निदर्शने केली होती. या निदर्शनांमुळे अमेरिकेतील धार्मिक सलोख्यावर विपरीत परिणाम झाला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article