For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Donald Trump threat to Iran "एका गोळीत उरलेल्यांना संपवू शकतो" अयातुल्ला खोमेंनीच्या अंत्यविधीवरुन ट्रम्प यांची धमकी

04:53 PM Jul 05, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
donald trump threat to iran  एका गोळीत उरलेल्यांना संपवू शकतो  अयातुल्ला खोमेंनीच्या अंत्यविधीवरुन ट्रम्प यांची धमकी
Donald Trump
Advertisement

इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्ला खोमेनी यांचा अंत्यविधी ४ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या अंत्यविधीवरुन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणवर शरसंधान साधले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या अंत्यविधीदरम्यान, देशातील उर्वरित नेतृत्वाला केवळ एका गोळीने संपवू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, वाटाघाटी करण्यासाठी 'कोणीही शिल्लक राहणार नाही' असे कारण देत, आपण असे करणार नाही, असेही ते म्हणाले.

Advertisement

"ते सर्व तिथेच आहेत. एकाच फटक्यात आपण त्या सर्वांना संपवू शकतो, पण आम्ही तसे करणार नाही कारण मग आमच्याकडे वाटाघाटी करायला कोणीही उरणार नाही... ते करार करण्यासाठी विनवणी करत आहेत," असे ट्रम्प यांनी ॲक्सिऑसला सांगितले.

ट्रम्प असेही सांगितले की, खामेनींच्या अंत्यविधीच्या आसपासचे कार्यक्रम संपेपर्यंत दोन्ही बाजूंनी चर्चेतून एक आठवड्याची सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान, कोणताही पक्ष दुसऱ्यावर हल्ला करणार नाही, असे ट्रम्प म्हणाले.

Advertisement

२४ तासांच्या आत  दफन करायला हवे होते

इराणवर ३६ वर्षे राज्य करणारे अली खामेनी २८ फेब्रुवारी रोजी मारले गेले - त्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले, ज्यामुळे मध्य-पूर्वेत युद्धाला सुरुवात झाली. अंतिम संस्कारांच्या वेळेबद्दल मार्च महिन्यापासूनच अटकळ बांधली जात होती. इस्लामी न्यायशास्त्रानुसार मृत व्यक्तीला शक्य तितक्या लवकर, आदर्शपणे २४ तासांच्या आत दफन करणे अपेक्षित असले तरी, युद्धजन्य परिस्थितीमुळे याला अपवाद होता.

इराणने अमेरिकेच्या निर्मितीचा २५० वा वर्धापनदिन असलेला ४ जुलै हा दिवस खामेनींच्या अंत्यविधीसाठी निवडला. अंत्यविधीमध्ये ७ जुलै रोजी तेहरानच्या दक्षिणेकडील पवित्र शहर कोम येथे कार्यक्रम आणि इतर धार्मिक विधींचा समावेश असेल.

९ जुलै रोजी ईशान्येकडील पवित्र शहर मशहद येथे खामेनींच्या दफनविधीने या अंत्यविधीची सांगता होईल. लाखो इराणी नागरिक रस्त्यावर जमले आहेत, त्यामुळे ही अंत्ययात्रा अत्यंत लक्षवेधी जागतिक घटनांपैकी एक बनली आहे.

शनिवारी, इराणचे माजी सर्वोच्च नेते यांच्या निरोप समारंभादरम्यान इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रडताना दिसले. यावर, अंत्यविधीच्या वेळी इराणी लोकांच्या रडण्याबद्दल ट्रम्प यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाले की, लोकांना खामेनीचा 'द्वेष' वाटतो असे त्यांना वाटले होते. "कदाचित हे खोटे अश्रू असतील," ट्रम्प म्हणाला.

व्हिडिओ पाहा : [embedyt] https://www.youtube.com/watch?v=pKmQ-DTetEY[/embedyt]

एका आठवड्याची सुट्टी दिली.

यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिकेने इराणला एका अंत्यविधीसाठी 'एका आठवड्याची सुट्टी' दिली होती.

"आम्ही व्हेनेझुएलाला एका दिवसात हरवले आणि इराणची चांगलीच धुलाई केली ; ते आता हिशोब चुकता करण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यांना हिशोब चुकता करण्याची खूपच तीव्र इच्छा आहे. आम्ही चांगले आहोत म्हणून त्याला एका अंत्यविधीसाठी आठवडाभराची सुट्टी दिली," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

मोजतबा खामेनी वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार?

सुरक्षेच्या कारणास्तव इराणचे सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी, त्यांचे वडील अली खामेनी यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्या भारतातील प्रतिनिधीने सांगितल्याचे वृत्त आहे.

अयातुल्ला हकीम इलाही यांच्या मते, इस्रायली धमक्या आणि पाळत ठेवण्याच्या धोक्यांमुळे मोजतबा यांची सार्वजनिक उपस्थिती "धोकादायक" ठरेल, असे वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.