For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रूकॉलरचे एआयवर चालणारे कॉल रेकॉर्डिंग फिचर

06:02 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रूकॉलरचे एआयवर चालणारे कॉल रेकॉर्डिंग फिचर
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

कॉलर आयडेंटिफिकेशन अॅप ट्रूकॉलरने भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉवर्ड कॉल रेकॉर्डिंग फीचर लॉन्च केल्याची घोषणा केली. या सुविधेत कॉल सारांश आणि तपशीलदेखील उपलब्ध असतील.

कंपनीने सांगितले की एआय आधारित कॉल रेकॉर्डिंग वैशिष्ट्यासाठी शुल्क आकारले जाईल आणि ते प्रीमियम सबक्रिप्शनसह उपलब्ध असेल. हे अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईल फोनवर काम करेल.

Advertisement

या फीचर अंतर्गत, यूजर्सना ट्रूकॉलर अॅपमध्ये थेट इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल रेकॉर्ड करण्याची क्षमता असेल. हे महत्त्वपूर्ण संभाषणे रेकॉर्ड आणि व्यवस्थापित करण्यासाठी एक सोयीस्कर आणि कार्यक्षम मार्ग प्रदान करते.

या वैशिष्ट्याची घोषणा करताना, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आगमनाने, वापरकर्त्यांना यापुढे आवश्यक तपशील प्रविष्ट करण्याची चिंता करावी लागणार नाही आणि यामुळे कॉल दरम्यान उत्पादकता सुधारेल.

कंपनीने सांगितले की या फीचरचा वापर करून संपूर्ण संभाषणाचा तपशील आणि त्याचा सारांशदेखील उपलब्ध होईल. याशिवाय, कोणत्याही कॉलरचे संभाषण इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिखित स्वरूपात रूपांतरित केले जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.