महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोव्यात भाजी घेऊन येणारे ट्रक अनमोडमध्ये रोखले

12:52 PM Jul 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान : गोवा सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी

Advertisement

मडगाव : घटप्रभा-कर्नाटक येथून गोव्यात भाजी घेऊन येणारे आठ ट्रक काल मंगळवारी अनमोड चेक नाक्यावर पोलिसांनी रोखून धरले. हे ट्रक नेमके कशासाठी रोखून धरले हे स्पष्ट झाले नव्हते. अनमोडनंतरचा गोव्यात येणारा रस्ता खराब असल्याचे कारण सांगून ट्रक रोखून धरल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली. हे ट्रक दिवसभर अनमोड येथेच पार्क करून ठेवण्यात आले व उशिरा त्यांना गोव्यात जाऊ दिले. परंतु, भाजी खराब झाल्याने सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ट्रक मालकांनी दिली. या आठ ट्रकांमधून कोंथबिर, पालक, पुदिना, कांदापात, मेथी, लालभाजी, फ्लॉवर इत्यादी भाजी घटप्रभा येथून गोव्यात आणली जात होती. हे ट्रक पहाटे 3 वा. अनमोड चेकनाक्यावर पोचले होते. हे सर्व ट्रक चेकनाक्यावर अडविण्यात आले. त्यांना गोव्यात जाण्यास मज्जाव करण्यात आला. अनमोडची हद्द संपल्यानंतर ते गोव्यात पोचले असते. गोव्यात येणारा रस्ता ही चांगला आहे. परंतु, अनेक विनंत्या करूनही ट्रक गोव्यात सोडण्यात आले नाही. त्यामुळे ट्रक मालकांनी नाराजी व्यक्त केली. संध्याकाळी उशिरा मडगावातील काही भाजी विक्रेत्यांनी अनमोडला जाऊन हे ट्रक गोव्यात आणण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, भाजी मोठ्या प्रमाणात खराब झाली.

Advertisement

मंगळवारी बेळगावला भाजी मार्केट बंद असल्याने घटप्रभा येथून गोव्यात भाजी आणली जाते. त्यामुळे गोव्याला ताजी भाजी उपलब्ध होत असते. चोर्ला घाटातून अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आल्याने सर्व अवजड वाहने अनमोडमार्गे गोव्यात ये-जा करतात, असे असताना हे भाजीचे ट्रक नेमके का रोखून धरले हे काल उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. भाजी घेऊन आलेल्या आठ ट्रकांपैकी 3 ट्रक मडगाव तर उर्वरित पाच ट्रक फोंडा, वास्को, सावर्डे, म्हापसा व पणजी येथे भाजी घेऊन जाणार होते. घटप्रभा ते अनमोड येथे अडविण्यात आलेल्या ट्रक चालकांनी दिवसभर गोव्यात सोडले जाणार असल्याची वाट पाहिली. नंतर त्यांनी मडगावातील विक्रेत्यांकडे संपर्क साधला व त्यांच्या मदतीने गोव्यात प्रवेश केला. परंतु, त्यांना भाजी खराब झाल्याने आर्थिक फटका बसला. अशाप्रकारे विनाकारण भाजीचे ट्रक अडविल्यास गोव्याला ताजी भाजी उपलब्ध होणे कठीण होणार आहे. त्याचबरोबर भाजीपुरवठा करणारे एजंट तसेच विक्रेते यांनाही फटका बसणार आहे. गोवा सरकारने या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी ट्रक मालकांनी केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article