ट्रकमालक संघटनेचा आज मध्यरात्रीपासून बेमुदत संप
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात डिझेल दरात झालेली वाढ आणि टोल शुल्कात वाढ केल्याच्या विरोधात राज्य ट्रकमालक संघटनेने सोमवार मध्यरात्रीपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. याबाबत राज्य ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष जी. आर. षण्मुगप्पा यांनी माहिती दिली. सोमवारी मध्यरात्रीपासून संप केला जाणार आहे. कोणत्याही कारणास्तव संप मागे घेतला जाणार नाही. इतर राज्यांतील ट्रकमालकांचासह राज्यव्यापी संपाला पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यात 6 लाखाहून अधिक ट्रक असून संपाला पाठिंबा देण्याद्वारे ट्रक वाहतूक थांबविली जाणार आहे. वाळूचे ट्रक आणि मालवाहू वाहनांसह सर्व प्रकारच्या मालवाहतूक सेवा स्थगित केल्या जातील. दुसरीकडे फेडरेशन ऑफ लॉरी ओनर्स असोसिएशनचे मानद अध्यक्ष चन्नारे•ाr यांनी या संपाला विरोध व्यक्त केला आहे. आम्ही या संपाला पाठिंबा दिलेला नाही. नेहमीप्रमाणे ट्रक रस्त्यावर धावणार आहेत. सार्वजनिकांनी काळजी करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुद्दूचेरी वगळता कर्नाटकात डिझेलचे दर कमी आहेत. सध्याचे दोन ऊपये करवाढ पाहिली तर ती ओझे ठरणार नाही. सरकारशी संघर्ष करण्याऐवजी तो संवादाद्वारे सोडवला पाहिजे, असेही चन्नारे•ाr म्हणाले.
राज्य सरकारने 1 एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून डिझेवरील विक्री करात 2.73 टक्के वाढ केली होती. यामुळे राज्यात डिझेल दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. डिझेल दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढणार आहेत. त्यामुळे तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी होत आहे. मात्र, सरकारने दरवाढीचे समर्थन केले आहे.