हलगानजीक नियंत्रण सुटून ट्रक सर्व्हिस रोडवर कलंडला
12:15 PM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हलगाजवळ बुधवारी पहाटे एक ट्रक कलंडला. सुदैवाने या अपघातात कोणतीच प्राणहानी झाली नाही. महामार्गावर वाहने उलटण्याचे प्रकार वाढले आहेत. राजस्थानहून बेंगळूरकडे जाणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून महामार्गावरून सर्व्हिस रोडवर ट्रक कलंडला. अपघातग्रस्त ट्रक साबण घेऊन जात होता, अशी माहिती मिळाली आहे.
Advertisement
Advertisement