For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळगाव येथे ट्रकची दुचाकीला धडक; चालक गंभीर

01:06 PM Nov 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
मळगाव येथे ट्रकची दुचाकीला धडक  चालक गंभीर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.हि घटना आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मळगाव- वेत्ये येथे चॉकलेट फॅक्टरीसमोर घडली.जखमी दुचाकी चालकाला रिक्षा मधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबतची माहिती वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली. दरम्यान मुंबई - गोवा हायवेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असताना त्याठिकाणी रुग्णवाहिकेची सोय नसल्यामुळे अनेक वेळा अडचणी येतात. त्यामुळे रुग्णवाहिकेची सोय करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.संबंधित दुचाकी चालक जखमी असल्यामुळे त्याची नेमकी माहिती समजू शकली नाही.

Advertisement
Advertisement
Tags :

.